Milk & Onion Price Problem Saam Digital
महाराष्ट्र

Milk & Onion Price Problem: दूध, कांदा प्रश्न पेटला! मंत्र्यांच्या घरावर जनावरं घेऊन मोर्चा काढणार, दुग्धाभिषेक घालणार, ठाकरे गटाचा इशारा

Milk & Onion Price Problem: सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला नाही तर येत्या दहा दिवसात दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Milk & Onion Price Problem

दुधाचे कोसळलेले दर आणि कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. नगर-मनमाड महामार्ग अडवत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला नाही तर येत्या दहा दिवसात दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.

दुधाला योग्य भाव द्यावा (Milk) आणि कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटनांसह आता शिवसेना उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर-मनमाड महामार्ग एक तासभर अडवत रास्ता रोको आंदोलन (Protest)करण्यात आलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवर आणि शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला नाही तर येत्या दहा दिवसात दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरावर जनावरांसह भव्य मोर्चा काढण्याचा आणि विखे पाटलांना दुग्धभिषेक घालण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हाती

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

SCROLL FOR NEXT