Maharashtra milk adulteration incident and food safety concerns 
महाराष्ट्र

धक्कादायक! दूध आटवताना झालं रबर; गरम केल्यानंतर 25 लिटर दुधाचा झाला घट्ट गोळा

Milk Turns Rubber: दूध आणि अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करत एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना चाप लावला आहे. राज्यभरात धडक कारवाई सुरु असतानाच कोजागिरी पोर्णिमेला एका मंडळाच्या कार्यकर्त्यांना धक्कादायक अनुभव आलाय. दूध गरम करताना नेमकं काय झालं? कुठे घडला आहे हा प्रकार ? पाहूया एक रिपोर्ट.

Suprim Maskar

हा प्रकार पाहिल्यावर तुम्हाला वाटेल काहीतरी नावीण्यपूर्ण पदार्थ गावकरी बनवतायेत. पण नाही...हे दूध आहे. तुम्हाला धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. दूध आटवल्यानंतर त्याचं चक्क रबर बनलं आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने दूध, पनीर आणि अन्न पदार्थांविरोधातल्या भेसळीविरोधात कारवाई बडगा उगारला आहे. त्यामुळे गावापासून ते शहरापर्यंतच्या भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.

मात्र अशा स्थितीतच मालेगाव तालुक्यातल्या रावळगावमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याचं झालं असं..रावळगाव येथील ओंकार नगर येथे श्री शिव गणेश नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने मोठ्या उत्साहात एकत्र आले होेते. त्यासाठी त्यांनी 25 लिटर दूध आणले होते. चुलीवर दूध आटवत असताना मात्र त्याचं काय झालं ते तुम्ही पहाताय...दूध चक्क रबर किंवा चिंगमसारखे ताणले जाऊ लागल्याने गावकऱ्यांना धक्का बसला.

दुधाचा घट्ट गोळा तयार झाल्याने दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित दूध विक्रेत्याला बोलावूनही तो समोर आला नसल्याची तक्रार आहे. ग्रामीण भागात अजूनही दूधात भेसळ होत असल्याचं वास्तव आहे. जुलै महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे माजी सैनिकाला असाच अनुभव आला होता. खाजगी दूध डेअरीमधून आणलेले दूध घरी तापवल्यावर त्याचं रबर झालं होतं. या प्रकाराची तक्रार एफडीएकडे करण्यात आली होती. आता मालेगावातील प्रकार समोर आल्यानंतर नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या भेसळखोरांना बेड्या ठोकल्याशिवाय चित्र पालटणार नाही, असा सुर सर्वत्र उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: किरण सरनाईक तिसऱ्या फेरी अखेर 3474 मतांनी आघाडीवर

डांबराचा नव्हे, चक्क सोन्याचा रस्ता; 24 कॅरेट सोन्याच्या रस्त्याची जगभरात चर्चा

Microsoft layoffs: मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा कर्मचारी कपात! 60 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

फायनान्स कंपनीच्या वसुलीचा आणखी एक बळी; हिंगोलीतही वसुली कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरूच

Alum Water Bath Benefits: तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT