BJP corporator Ashish Nerlakar’s children under scrutiny after scoring 99 percentile in MHT-CET amid opposition allegations saam tv
महाराष्ट्र

बारावीत 50%… CET मध्ये 99%! भाजप नगरसेवकांच्या मुलांवर मोठा संशय; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Bjp Corporator Children 99 Percentile Mht Cet Controversy: नांदेडमधील भाजप नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या मुलांना MHT-CET मध्ये 99 पर्सेंटाईल मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. बारावी आणि JEE मधील कमी गुणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गैरप्रकाराचा आरोप केला असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड: एमएचसीईटीच्या MH-CET परीक्षेत ही गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. नांदेड येथील भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99 टक्के गुण इंजिनियरिंग प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटीसीईटी परीक्षेत मिळाले असून त्यांना बारावीमध्ये पीसीएम (PCM) ग्रुपमध्ये केवळ 56 टक्के आणि 51 टक्के होते. तर JEE परीक्षेत 51% आणि 28 % गुण मिळाले होते. पण एमएच-सीईटी परीक्षेमध्ये मात्र त्यांना 99% गुण मिळाले असल्याचा दावा काँग्रेसचे नेते बालाजी गाढे यांनी केलाय. भाजपचे नांदेडचे पदाधिकारी तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांना जुळे मुलगा आणि मुलगी आहे. अवनी आणि आरुष अशी त्यांची नावं असून बारावीमध्ये आणि JEE परीक्षेमध्ये मार्कांची एवढी तफावत असताना MH-CET परीक्षेत अनुक्रमे 99% कसे गुण मिळालेत असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

पेपरफुटी आणि भारतीय जनता पार्टीचे अतिशय जवळचं नातं आहे. भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या मुलाला आणि मुलीला बारावी मध्ये 51% आणि 56% मार्क्स आहेत. परंतु MH-TCET मध्ये मात्र याच मुलांना 99 टक्के गुण मिळाले आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणी बालाजी गाडे पाटील यांनी केली आहे.

मात्र हे सर्व आरोप नगरसेवक आशिष नेरलकर यांनी फेटाळले. सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या दोन्ही मुलांनी पूर्वीपासून MH - CET परीक्षेची तयारी केली होती. त्यांचे लक्ष्यच MH - CET परीक्षा होती. बारावीत गुण कमी आणि CET परीक्षेत जास्त गुण असा आरोप केला जात आहे. मात्र बारावीच्या ग्रुपमधील गुण आणि CET मधील गुण यांचा काहीच संबध नसतो. बारावीत असताना माझी मुलं CET ची तयारी करत होते. त्यामुळे बारावीत कमी गुण मिळाले असे आशिष नेरलकर म्हणाले. कुठलाही पेपर फुटला नाही. आम्ही कोणताही गैरप्रकार केला नाही. हवी ती चौकशी लावा असं आशिष नेरलकर म्हणाले. अशा खोट्या आरोपांमुळे माझी मुलं मानसिक तणावात असल्याचे आशिष नेरलकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

SCROLL FOR NEXT