Mhada News saam tv
महाराष्ट्र

MHADA Home: मुंबईकरांसाठी म्हाडाकडून मोठं गिफ्ट, ५ हजार घरांची बंपर लॉटरी; नाशिक, पुणे अन् संभाजीनगरात मिळणार घरे

MHADA to Build 19,497 Houses Across Maharashtra: म्हाडाचा मोठा निर्णय! मुंबईत ५,१९९ घरे, तर राज्यभरात एकूण १९,४९७ घरे बांधण्याची योजना.

Bhagyashree Kamble

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण येत्या वर्षभरात मुंबईत ५,१९९ घरे बांधणार आहे. म्हाडाचे मुंबई बोर्ड नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ५,७४९.४९ कोटी रूपये खर्च करणार आहे.

मुंबई तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, विरार येथे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कोकण मंडळाने २०२५-२०२६ मध्ये ९,९०२ घरे बांधण्याची योजना आखली आहे. ही घरे बांधण्यासाठी कोकण मंडळाकडून १४०.८५ कोटी रूपये खर्च केले जाणार आहे.

नाशिक, पुणे, संभाजी नगर, नागपूर येथेही घरे बांधली जाणार

म्हाडाने अर्थसंकल्पात राज्यभरात १९,४९७ घरे बांधण्याची योजना आखली आहे. मुंबई आणि कोकण मंडळासोबतच, म्हाडाने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे घरे बांधण्याची योजना आखली आहे. याचा फायदा नक्कीच सर्वसामांन्याना होईल.

मुंबईतील विविध प्रकल्पांसाठी मिळणार निधी

मुंबई मंडळाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. अर्थसंकल्पातून सर्व प्रकल्पांची गती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबई मंडळाला मिळालेल्या एकूण रकमेपैकी सर्वाधिक रक्कम मुंबईतील १०० वर्षे जुन्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाठी देण्यात आली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात २,८०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तर, जोगेश्वरी पूर्वेतील पीएमजीपी कॉलनी प्रकल्पासाठी ३५० रूपये, वांद्रे पश्चिमेतील परिधान खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रूपये, गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर येथे घरे बांधण्यासाठी ५७३ कोटी रूपये, परळमधील जिजामाता नगर भूखंडात मुला- मुलींसाठी वसतिगृहे बांधण्यासाठी २० कोटी रूपये, गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी ५७.५० कोटी रूपये देण्यात आले आहे.

बोरिवली सर्वेक्षण क्रमांक १६० योजनेसाठी २०० कोटी रूपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुनर्विकास प्रकल्पासाठी २०० कोटी रूपये, गोरेगाव प्रकल्पासाठी ५० कोटी रूपये, मागाठाणे बोरिवली योजनेसाठी ८५ कोटी रूपये आणि गोरेगाव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रूपये देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT