Applicants rush to complete forms as MHADA extends the deadline for Mumbai housing lottery till May 14, 2026. saam tv
महाराष्ट्र

Mhada Lottery: खुशखबर! मुंबईतील २६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवी डेडलाइन

MHADA Lottery Update: म्हाडाने मुंबईतील २,६४० घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. दरम्यान कोणत्या गटासाठी किती घरांची सोडत निघणार आहे ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • मुंबईतील २६४० म्हाडा घरांसाठी अर्जाची मुदत वाढली

  • नवी अंतिम तारीख १४ मे २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत

  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने एका आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० घरांसाठी करण्यात येणाऱ्या अर्जांची मुदत वाढवण्यात आली आहे. संगणकीय सोडत प्रणालीमधील ऑनलाईन अर्ज नोंदणी अर्ज स्वीकृती आणि अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा प्रक्रियेला १४ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार १४ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. तर १५ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. अर्जदारांना १५ मे २०२६ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करू शकतील.

सोडत कधी निघणार?

म्हाडाकडून २२ मे २०२६ रोजी दुपारी ०३.००वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. २५ मे २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येतील. तर दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे. तर प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ५ जून २०२६ रोजी जाहीर होईल. सोडतीचे स्थळ मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळातर्फे दि. ३० मार्च २०२६ रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा येथील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील घरांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर केली जाईल.

कोणत्या गटासाठी किती घरं?

यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) १४५ घरं

अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ८५८

मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) १४०८

उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २२९ घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT