Mehul Choksi Saam TV
महाराष्ट्र

Mehul Choksi: मेहुल चोक्सीची बेनामी शेकडो एकर जमीन जप्त

आर्थिक गैरव्यवहार, बँक घोटाळा, मनी लॉन्ड्रीग, पीएनबी बँकेसह (PNB Bank) हजारो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोक्सी याची नाशिक जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन जप्त.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार, बँक घोटाळा, मनी लाँडरिंग, पीएनबी बँकेसह (PNB Bank) हजारो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोक्सी याची नाशिक जिल्ह्यातील आणखी शेकडो एकर जमीन आयकर विभागाने (Income Tax Department) जप्त केली आहे.

मेहुल चोक्सीच्या (Mehul Choksi) बेनामी संपत्तीवर आयकर विभागाने कारवाई केलेली शेकडो एकर बेनामी जमीन नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यात असल्याचं समोर आलं आहे. मुंढेगावच्या बळवंतवाडीमध्ये मेहुल चोक्सीची नावावर असलेले शेकडो एकर बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे.

गीतांजली जेम्ससह, नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसईझेड लिमिटेडच्या नावे नामी आणि बेनामी संपत्ती असल्याचं समोर आहे. आयकर विभागाने एकूण 57 गटातील शेकडो एकर जागा केली जप्त केली आहे. मेहुल चोक्सीला पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस घोषीत केली असून चोक्सी यंत्रणांना सतत देतोय गुंगारा देतोय.

चोक्सीची बळवंतवाडीतील जप्त केलेल्या जागेची किंमत शेकडो कोटींच्या घरात असून आयकर विभागाने जप्त केलेल्या जागेवर बँकांसह कुणालाही दावा करता येणार नसल्याचं आयकर विभागाने केलं स्पष्ट आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT