MSRTC Bus Saam
महाराष्ट्र

MSRTC Recruitment: एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

ST Mahamandal to Conduct Mega Recruitment: एसटी महामंडळामध्ये लवकरच मेगाभरती होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळामध्ये लवकरच मेगाभरती होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. यासंदर्भातील अधिकृत सूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी बेस्ट बसच्या प्रवास भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली होती. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ही भाडेवाढ ८ मे पासून लागू करण्यात आली असून, आता एसटी महामंडळाने मेगाभरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेगाभरतीसह गाड्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील रिक्त पदांमुळे सेवा व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरच चालक, वाहक, यांत्रिकी, लिपिक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची अधिकृत सूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT