Mira Road Police Saam tv
महाराष्ट्र

Mira Road Police: पोलिसावर हल्ला करून आरोपी फरार; मीरा रोड येथील घटना

पोलिसावर हल्ला करून आरोपी फरार; मीरा रोड येथील घटना

चेतन इंगळे

मीरा रोड : चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या आरोपीने पोलिसावर हल्ला करून पळ काढला. यात एक पोलीस (police) कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा प्रकार मध्यवर्ती गुन्हे (Mira Road) शाखेच्या कार्यालयात रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास घडला. आरोपीचा शोध सुरु आहे. (Live Marathi News)

मीरा रोड येथे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कार्यालय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला आणले होते. यावेळी बंदोबस्तासाठी दोन पोलीस कर्मचारी होते. दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बंदोबस्तावरील एक पोलीस कर्मचारी जेवण आणण्यासाठी गेले असता जयकुमार राठोड हे पोलीस हवालदार कार्यालयात एकटेच होते. याचवेळी आरोपीने बेडीतून हात बाहेर काढत लोखंडी रॉडने जयकुमार राठोड यांच्या डोक्यावर हल्ला करत कार्यालातून पळून गेला. अचानक झालेल्या हल्ल्याने राठोड खाली पडले.  

आरोपीच्या शोधासाठी पथक 

पोलीस कर्मचारी राठोड यांच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखम झाली असून त्यांना उपचारासाठी मीरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT