Medicines  Saam Tv
महाराष्ट्र

Shortage of Medicines : राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा; तामिळनाडू पॅटर्न राबवण्यात का होतेय दिरंगाई?

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या दरांमध्ये एकसूत्रता येण्यासाठी हाफकीन जीव औषध महामंडळ निर्माण करण्यात आले.

साम टिव्ही ब्युरो

Medicines : राज्यात मधुमेह, रक्तदाब, कर्करोग अशा गंभीर आजारांवर नागरिकांना योग्य आणि तातडीने औषधपुरवठा करता यावा यासाठी तामिळनाडू पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर "महाराष्ट्र वैद्यकीय सेवा महामंडळ " प्रस्तावित करण्यात आले. मात्र अद्यापही अनेक रुग्णांना वेळेवर औषध मिळत नाहीये. (Latest Marathi News)

राज्यात रुग्णालयांमध्ये २०१७ पूर्वी प्रत्येक विभागामार्फत औषधे, उपकरणे व यंत्रसामग्री खरेदी केली जात होती. प्रत्येक विभागामार्फत स्वतंत्र खरेदी केल्याने वेगवेगळ्या दराने औषधे खरेदी करावी लागत होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या दरांमध्ये एकसूत्रता येण्यासाठी हाफकीन जीव औषध महामंडळ निर्माण करण्यात आले.

सर्व प्रकारची औषधे व उपकरणे खरेदी तसेच सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी आणि पुरवठा पद्धती अधिक गतिमान तसेच सुरळीत करण्यासाठी तामिळनाडू पॅटर्न राबवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तामिळनाडू राज्यातील वैद्यकीय सेवा महामंडळाचा अभ्यास दौरा झाला. दौऱ्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली स्वतंत्र "महाराष्ट्र वैद्यकीय सेवा महामंडळ " स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले.

मात्र सरकार स्तरावर वेळकाढूपणा सुरु असल्याने औषध खरेदीत दिरंगाई होते आहे. याउलट ज्या पुरवठादारांनी औषध पुरवठा केला आहे, त्यांचीही देयके शासन स्तरावर अडकून पडली आहेत. परिणामी राज्यातील रुग्णालयात मधुमेह, रक्तदाब, कर्करोग अशा जीवघेण्या आजारांच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Business Ideas For Women: 12 वी पास महिलांसाठी कामाची संधी, हे 5 बिझनेस लवकरात लवकर सुरू करा

ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत तणाव? भाजपचा जरांगेंआडून शिंदेंना संपवण्याचं कट? फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कुणाची ताकद?

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पैशांचा सुळसुळाट, मतदारांना 10 हजार वाटल्याचा विरोधकांचा आरोप

फटाके बनवत असताना भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT