मांसाहार प्रेमींसाठी मोठी बातमी! चिकन-अंड्याचे दर वाढण्याची शक्यता Saam Tv
महाराष्ट्र

मांसाहार प्रेमींसाठी मोठी बातमी! चिकन-अंड्याचे दर वाढण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी, मोठ्या प्रमाणात मटण, मासे, चिकन आणि अंड्यांचा वापर आहारात केला जातो.

अभिजीत सोनावणे

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी, मोठ्या प्रमाणात मटण, मासे, चिकन आणि अंड्यांचा वापर आहारात केला जातो. मात्र हटलेले निर्बंध आणि तिसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर आता चिकन आणि अंड्यांच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याचं पाहायला मिळतंय.

कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा अंडी आणि चिकनचे भाव वाढले असून बाजारपेठेत या पुढील काळात देखील दोन्ही वस्तुंचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या अंड्याला मागणी वाढलीय, मात्र पुरवठा कमी होत असल्यानं अंड्याचे भाव वाढले आहेत. या पुढेही भावात वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. चिकनची ( कोंबडी) किंमतही 100 रुपये प्रती किलो आहे. कोंबड्यांना पोसण्यासाठी लागणाऱ्या धान्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

धान्याच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या किमतीत तीन पटींनी जास्त वाढ झाली असून याचा परिणाम चिकन आणि अंड्यांच्या दरावरही पाहायला मिळतोय. त्यामुळे श्रावणमास सुरू असला, तरी चिकन आणि अंड्यांच्या दरात वाढ झालीय. चिकनचा होलसेल दर 75 रुपयांवरून 95 रुपये झालाय, तर अंड्याची किंमतही साडे चार रुपये झालीय. येत्या काळात चिकन आणि अंड्ड्यांच्या भावात 25 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय. त्यासाठी अंडी, चिकनचा आहार करण्यावर भर दिला जातोय. आगामी तिसऱ्या लाटेच्या भीतीनं मांसाहार करण्याकडे अनेकांचा कल वाढला असून बाजारात पुन्हा एकदा मांसाहाराला मागणी वाढलीय. त्यामुळे चिकन आणि अंडी यांना पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची चिन्हं आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

SCROLL FOR NEXT