Zp School Saam tv
महाराष्ट्र

Zp School : मराठी सोबतच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचेही धडे; मावळच्या जिल्हा परिषदे शाळेचा अभिनव उपक्रम

Maval News : उपक्रम भाषेपुरता मर्यादित नाही, तो मुलांच्या व्यक्तिगत विकासाच्या दिशेने एक पाऊल आहे. भविष्यात मुले जर्मन किंवा अन्य परदेशी भाषांमधून उच्च शिक्षण घेऊ शकतील मत शिक्षिका कालिंदी कस्पटे यांनी व्यक्त केले

दिलीप कांबळे

मावळ : माय मराठीतील अ, ब, क, ड, या अक्षरांची ओळख करून देण्यासोबतच विद्यार्थ्यांना वेगळ्या भाषेची ओळख व्हावी या अनुषंगाने जर्मन भाषेचेही धडे दिले जात आहेत. मावळच्या सुदुंबरे या आदिवासी परिसर असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा एक अनोखा अभिनव उपक्रम आहे. शाळेतील आदिवासी विद्यार्थी देखील जर्मन भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. 

मावळच्या सुदुंबरे गावातील संत तुकाराम नगर मधील आदिवासी वस्तीत जिल्हा परिषदची शाळा आहे. या शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना मराठीतील अ ब क ड ई सोबतच जर्मन भाषेचेही ज्ञानदान दिले जात आहे. हे जर्मन भाषेचे ज्ञान विद्यार्थी आवडीने आत्मसात करताना दिसत आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पारंपारिक व्यवहार ठाकर भाषेतच होतात. तरी देखील शाळेने हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. 

सुरवातीला शिक्षकांनी शिकली जर्मन भाषा  

शाळेतील मुलांमध्ये इतर भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी क्षमता निर्माण व्हावी. यासाठी शिक्षकांनी जर्मन भाषा शिकून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहे. हा मावळतील प्रयोग पहिलाच जिल्हा परिषदच्या शाळेत केला आहेत. या शाळेच्या शिक्षिका कालिंदी कस्पटे यांनी जर्मन भाषा मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जर्मन भाषेतील प्राथमिक शब्दसंग्रह संवाद आणि उच्चार मुलांना शिकवण्यास सुरुवात केली आहे. 

मुलांकडून नियमित बोलण्याचा प्रयत्न 

गुड मॉर्निंग, थँक्यू, गुड नाईट, हाऊ आर यू, यासारख्या शब्दांचा सराव मुलांकडून होऊ लागला आहे. तिसरी आणि चौथ्या वर्गातील वीस मुले आपल्या आपसातही जर्मन भाषेतील शब्द वापरून संवाद साधू लागली आहे. दरम्यान अभ्यासक्रम सध्या संवादाभोवती केंद्रित झाला आहे. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त मुले आपली माहिती, आवड निवड, घरातील गोष्टी, वाचन अशा विषयावर जर्मन शब्दात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. लेखन उच्चार आणि ऐकण्याचा सरावही सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT