मावळ : बेलज गावाजवळच आद्रा धरण आहे. याचे बॅक वॉटर गावापर्यंत पोहचले आहे. दरम्यान या बॅक वॉटरच काही मुली खेळत असताना तोल जाऊन एक युवती पाण्यात पडली. यात बुडून एका पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरलेली आहे. दरम्यान शोधकार्य सुरु करण्यात आले होते.
मावळच्या बेलज गावातील दीक्षा प्रवीण ओव्हाळ (वय १५) असे मृत झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. दरम्यान दीक्षा ही आपल्या मैत्रिणींसोबत आद्रा धरणाच्या बॅग वॉटर जवळ खेळण्यासाठी गेली होती. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने बाहेर निघता आले नाही. यात काही क्षणातच ती पाण्यात बुडाली. सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणी आरडाओरडत केली, मात्र ती वर आली नाही.
घाबरलेल्या मैत्रिणींनी घरी जाऊन सांगितली घटना
दीक्षा हिच्या मैत्रिणी या घटनेने घाबरून गेल्या होत्या. त्यांनी धावत जात घरी घटनेची माहिती दिली. याची माहिती मिळताच गावात एकच खडबड उडाली. यानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाला आणि वडगाव पोलीस ठाण्यासोबत संपर्क साधला. वडगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व माहिती घेतली आणि वन्यजीव रक्षक बाबत या संस्थेला प्रकरणाची माहिती देण्यात आली.
कुटुंबीयांचा आक्रोश
दरम्यान वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेच्या जवानांनी धरणाच्या पाण्यात उतरून शोध घेतल्यानंतर काही वेळातच दीक्षाचा मृतदेह बाहेर काढला. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला असून तपास वडगाव पोलीस करीत आहे. तर मुलीचा मृतदेह पाहून तिच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.