Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : मित्रांसोबत पोहायला गेला असता तरुण नदीत बुडाला; देहुरोड येथील दुर्दैवी घटना

Maval News : गंहुजे येथील पवना नदी ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत याच भागात राहणारा वीस वर्षाय रोहन रॉय हा देखील होता. तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी उतरले होते. पोहत असताना नदीच्या मधोमध गेले

दिलीप कांबळे

मावळ : मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला असता तरुण नदीत बुडाला असल्याची घटना देहूरोड येथे घडली आहे. या घटनेत सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने तीन तास तपास करत मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मावळच्या देहुरोड थॉमस कॉलनी येथील रोहन रॉय (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. देहूरोड परिसरातील रहिवासी असलेले तीन मित्र असलेले तरुण मुले सहावारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गंहुजे येथील पवना नदी ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत याच भागात राहणारा वीस वर्षाय रोहन रॉय हा देखील होता. तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी उतरले होते. पोहत असताना नदीच्या मधोमध गेले. 

पोहता पोहता पाण्यात बुडाला 

मात्र पाण्यात पोहत असताना नदी पात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने पोहता पोहता अचानक रोहन दिसेनासा झाला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मिळून आला नाही. या घटनेची माहिती शिरगाव परदंवडी पोलिस ठाणे तसेच वन्यजिव संरक्षण संस्था यांना देण्यात आली. यानंतर पोलीस पथकासह पवना नदीच्या ठिकाणी दाखल होत शोधकार्य सुरु केला. 

तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह काढला बाहेर 

शोध पथकाने घटनास्थळावर दाखल होत तब्बल तीन तास प्रयत्न करून रोहनचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. यानंतर शिरगाव पोलिसांच्या मदतीने मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी परंदवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान घटनेची माहिती कुटुंबीयाना मिळाल्यानंतर कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केळीचे भाव कोसळले, अतिवृष्टीच्या संकटानंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट

Dombivli Crime : डोंबिवलीत मोठा राडा! परागाच्या मुद्द्यावरून चाकू हल्ला, रिक्षा युनियन लीडरवर सपासप वार

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, कोणी दिला इशारा? VIDEO

Dia Mirza: दिया मिर्झाचा क्लासिकल फ्यूजन ड्रेस स्टाईल, या दिवाळीला तुम्हीही करा रिक्रिएट

Badnera Crime : बडनेऱ्यात ढाबा चालक, महिलेला मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT