Pavana Dam Saam tv
महाराष्ट्र

पवना धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू; पाच जणांना वाचविण्यात यश

पवना धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू; पाच जणांना वाचविण्यात यश

दिलीप कांबळे

मावळ : मावळातील पवना धरण परिसरात पर्यटनकरिता आलेल्या मुंबई येथील एका ग्रुपमधील सात जण धरणाच्या जलाशयात बुडाले होते. पैकी दोन जणांचा बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना पुढे आली. तर अन्य पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Maval News Pavana Dam)

मिळालेल्या माहितीनुसार समीर कुलदीप सक्‍सेना (वय ४३), पत्‍नी पायल सक्‍सेना (वय ४२) त्‍यांची दोन मुले व मुलांचे मित्र असे सात जण पवना धरण (Pavana Dam) परिसरात फिरायला आले होते. या दरम्‍यान ते फांगणे गावाच्‍या हद्दीत पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात ते सर्वजण बुडाले. सदरची माहिती लोणावळा (Lonavala) ग्रामीण पोलिसांना कळताच पोलीस घटना स्थळावर आले. दरम्यान आर्या दीपक जैन (वय १३), समीर कुलदीप सक्सेना यांना पाण्यातून बाहेर काढले आहे. मात्र ते दोघेही मयत झाले असून बाकी सर्वांना वाचविण्यात यश आले आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुट्या खाद्यतेल विक्री बंदी विरोधात व्यापारी आक्रमक

मोठी बातमी! खासगी कोचिंग क्लासेसबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतला तर...

Mahabharata: भगवान श्रीकृष्ण यांनी कोणाला दिला होता दुर्गंधी येण्याचा श्राप?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरवलं, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Peri Peri French Fries Recipe: रेस्टॉरंटस्टाईल कुरकुरीत पेरी-पेरी फ्रेंच फ्राईज बनवा घरच्या घरी;वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT