Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : मावळच्या कुंडमळा येथील छोट्या पुलावर धोकादायक वाहतूक; पर्यटकही रील- सेल्फी काढण्यात व्यस्त

Maval news : मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडमळा येथील इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दिलीप कांबळे

मावळ : राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यानुसार मावळ तालुक्याला देखील पावसाने अक्षरशः झोडपले असून पावसाची संततधार सुरू असून कुंडमळा येथील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान कुंडमळा येथील छोट्या पुलावर धोकादायक वाहतूक सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

मावळ (Maval) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडमळा येथील इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लोणावळ्यात (Lonavala) उगम पावणारी नदीत पावसाच्या पाण्याने नदी पात्रात मोठी वाढ झाली आहे. तर पिंपरी- चिंचवड आणि पुणेकरांचे आकर्षण असणारे कुंडमळा धबधबे वाहू लागलेत. मात्र याच कुंडमळ्याकडे जाणाऱ्या छोट्या पुलावर वाहन चालक धोकादायक वाहतूक करत असल्याचं चित्रं दिसून येत आहे. पाण्याची पातळी वाढली असताना हा फाजीलपणा जीवावर बेतू शकतो. 

लोणावळा येथे काही दिवसांपूर्वी धबधब्यावर गेलेले पर्यटक वाहून गेल्याने ५ जणांचा मृत्यू झाला होता. तरी देखील पर्यटक धबधबा व नदीवर जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान धोक्याची पातळी गाठलेल्या (Indrayani River) इंद्रायणी नदीत जाताना बरेचसे पर्यटक दिसत आहे. येथे जाऊन रिल्स बनविणे व सेल्फी काढण्यास व्यस्त असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा असूनही पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT