मावळ : मावळ तालुक्यातील तीनही नगरपरिषदांसाठी आगामी निवडणुका होणार आहे. याचे वेध आता लागणार आहे. दरम्यान तालुक्यातील लोणावळा, तळेगाव आणि वडगाव मावळ या तिन्ही नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची सोडत अखेर जाहीर झाली असून, स्थानिक राजकीय वातावरणाला चांगलाच उकाळा आला आहे.
मावळ तालुक्यातील तिन्ही नागरपरिषषदांच्या सदर सोडतीनंतर आता तिन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलं आहे. कोण कोणत्या प्रभागातून उमेदवारी दाखल करणार, कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला कोण राखणार, आणि विशेषतः वडगाव मावळमध्ये “कारभारीन” कोण होणार, या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तळेगावमध्ये रंगणार चुरस
लोणावळा नगरपरिषदेतील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक दिग्गजांच्या राजकीय गणितात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोणावळा नगरपरिषदेतील एकूण २७ प्रभागांची सोडत जाहीर करण्यात आली असून, नव्या प्रभाग रचनेनुसार अनेक भागांचे सीमांकन पुन्हा आखण्यात आले आहे. तळेगाव नगरपरिषदेत १४ प्रभागांची सोडत काढण्यात आली असून, येथील नगराध्यक्षपद ओपन (सर्वसाधारण) ठेवण्यात आले आहे.
वडगाव मावळकडे लक्ष
तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव मावळ नगरपरिषदेतील १७ प्रभागांची सोडत काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अनेक महिला नेत्यांसाठी हा निर्णय राजकारणात नवे दालन उघडणारा ठरू शकतो, तर पारंपरिक पुरुष नेतृत्व असलेल्या गटांमध्ये नव्याने रणनीती आखण्याची लगबग सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.