River Flood in Maval  Saam tv
महाराष्ट्र

Maval Heavy Rain : मुसळधार पावसाचा तडाखा; मावळ झाले जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला

River Flood in Maval : सलग चार- पाच दिवसांपासून मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने नदी- नाल्यांना पूर आला आहे. परिणामी मावळच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दिलीप कांबळे

दिलीप कांबळे
मावळ
: राज्यभरात जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यानुसार मावळ परिसरात देखील मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून या पावसामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान अजून दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मावळ तालुक्यात देखील हाहाकार माजवला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या- नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कडधे, कोथुर्णे, धामणे या गावांचे पूल पाण्याखाली गेले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धामणे व परिसरातील गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.

नदी- नाले वाहताय धोकेदायक पातळीवर 

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे लोणावळा घाट माथ्यापासून ते तळेगाव, पवनानगर परिसरात नदी- नाले धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. कडधे व कोथुरने येथील पूल पाण्याखाली गेल्याने शाळकरी मुलांसह शेतकऱ्यांना प्रवास करणे अशक्य झाले आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास पवना, आंध्रा व इंद्रायणी नदीला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

कुंडमळ्यातील अपघात ग्रस्त लोखंडी पूल गेला वाहून...
मावळात गेले चार- पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. कुंड मळ्यातील इंद्रायणी नदीनेही रुद्ररूप धारण केले आहे. दरम्यान दोन महिन्यापूर्वी कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र तो अपघात ग्रस्त पूल नदीपात्रातच ठेवण्यात आलेला होता. आता इंद्रायणी नदीने रुद्र रूप धारण केल्यामुळे हा लोखंडी पूल वाहून गेलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोविंद बर्गे प्रकरणात नर्तिकेची मोठी कबुली, पोलिसांसमोर अखेर तोंड उघडलं, नेमकं काय म्हणाली?

OBC Protest: मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा; दसऱ्यानंतर ओबीसी आंदोलक मुंबईत धडकणार?

Maharashtra Live News Update: तुम्हाला १० टक्के आरक्षण नको का? भुजबळांचा मराठा समाजाला सवाल

Hruta Durgule: महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेचा नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का?

Accident: दौंडमध्ये अपघाताचा थरार, शाळकरी विद्यार्थिनीला डंपरने चिरडलं, थरकाप उडवणारा सीसीटीव्ही VIDEO

SCROLL FOR NEXT