Dehu Road Railway Station Saam TV
महाराष्ट्र

Dehu Road Railway Station : केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत देहूरोड रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

Maval News : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे लोणावळा लोहमार्गावरील या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजने अंतर्गत ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

दिलीप कांबळे

Maval News :

मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड आणि चिंचवड या रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश केला जात आहे. यात देहूरोड रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे लोणावळा लोहमार्गावरील या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजने अंतर्गत ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला आहे.

या अमृत भारत स्टेशनमध्ये पुणे विभागातील दहा आणि मध्य रेल्वेच्या 36 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. यात देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी, केडगाव, बारामती, लोनंद, वाठार, कराड आणि सांगली यांचा समावेश असणार आहे.

या योजनेंतर्गत 1309 स्थानकांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रुपये निधी केंद्र सरकार कडून देण्यात आला आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून, देहूरोड आणि चिंचवड स्टेशनच्या अमृत भारत योजनेअंतर्गत विकास होणार आहे

कसे असेल देहूरोड रेल्वे स्टेशन?

• सुसज्ज एन्ट्री गेट

• लिफ्ट, नवीन दादरा FOB

• सुसज्ज वेटिंग एरिया

• वातानुकूलित वेटिंग रूम

• कोच इंडिकेटर

•. गार्डन दोन्ही साईडला

• अत्याधुनिक नवीन तिकीट घर

•.भव्य दिव्य आधुनिक रिक्षा स्टॉप

• सीसीटीव्ही

•. नवीन अनाउन्समेंट सिस्टीम

• डिजिटल ट्रेन टाइम डिस्पले

या सोयीसुविधा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT