Maval Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Maval Vidhan Sabha : मावळचा गड यंदा कोणाकडे?; महायुतीतील राष्ट्रवादीसोबत अपक्षांची झुंज, आघाडीही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी

Maval News : १९९५ ते २०१४ या काळात भाजपने मावळचा गड अबाधित राखून ठेवला होता. मावळ मतदारसंघात भाजपचे मोठे प्राबल्य आहे.

दिलीप कांबळे

मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी २०१९ मध्ये इतिहास घडविला. तब्बल पंचवीस वर्ष भाजपची सत्ता असलेल्या मावळ मतदारसंघ राषट्रवादीकडे शेळके यांनी खेचून आणला होता. भाजपचेच असलेले सुनील शेळके यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधून विजय संपादन केला होता. मात्र यावेळी मावळ मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे. राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. 

मावळ मतदारसंघात अपक्ष उभे असलेले बापू भेगडे यांना मावळ तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची साथ आहे. तर मनसे व महाविकास आघाडीने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बापू भेगडे आणि समर्थक यांनी मावळचा गड काबीज करण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान सुनील शेळके यांच्या सोबत मावळमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत कोणतेही मोठे नेते नाही. मात्र जनता शेळके यांच्या सोबत आहे. चार हजार कोटी रुपये पेक्षा जास्त निधी आणून मावळचा विकास केला असल्याचे आमदर सुनील शेळके म्हणत आहे; ही त्यांची जमेची बाजू आहे. 

१९९५ पासून भाजपने राखला गड 

१९६२ साली पहिल्यांदा मावळची निवडणूक झाली. यामध्ये काँग्रेसचे नामदेव मोहोळ विजयी झाले होते. १९७२ मध्ये भारतीय जनसंघाने ही जागा जिंकली होती. त्यानंतर १९९० मध्ये ही जागा फक्त काँग्रेस पक्षाने जिंकली होती. तर १९९५ ते २०१४ या काळात भाजपने मावळचा गड अबाधित राखून ठेवला होता. मावळ मतदारसंघात भाजपचे मोठे प्राबल्य आहे. मात्र २०१४ ला दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वडगाव, लोणावळा, तळेगावमधील मतदार ठरवणार आमदार
राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी थेट लढत बघायला मिळत असली तरी वडगाव, लोणावळा आणि तळेगाव या भागातील शहरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो; यावर उमेदवारांचे गणित असणार आहे. लोकसभा निवडणुकीत शहरी भागातून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांना चार हजार मताधिक्य मिळाले होते. तर ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पुढे होते. बारणे यांना मतदारसंघात चार हजारांनी लीड मिळाला होत. आता विधानसभेला दोन्ही उमेदवारांची सध्या शहरी मतदारावर लक्ष केंद्रित केले होते. विशेष म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही मोठा नेता प्रचाराला मावळात आलेला नाही. तर अपक्ष आमदारांच्या प्रचारालाही बाहेरून नेता आलेला नाही. त्यामुळे निकालाच्या दिवशी मावळात बाजी कोण मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पैसे वाटावे लागणे दुर्दैवी : अंबादास दानवे

Hitendra Thakur : पत्रकार परिषद घेऊ नका, असं कोणत्या कायद्यात आहे? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल, VIDEO

Parola News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon Election: पाचोऱ्यात मविआच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक, आमदारावर आरोप

Vinod Tawde : '४० वर्षे निवडणुकीत...'; पैसे वाटप केल्याच्या आरोपावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT