Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : मावळात भाजपला आणखी एक धक्का; बाळासाहेब नेवाळेंचा राजीनामा

Maval News : मावळात भाजपला प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदी रुजू असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठा धक्का बसला आहे

दिलीप कांबळे

मावळ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळात भाजपला अजून एक मोठा धक्का बसला आहे. प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेवाळे यांच्या मागे मोठा शेतकरी वर्ग असल्याचे भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मावळात (Maval) भाजपला प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदी रुजू असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून मावळ तालुक्यात भाजप नेते मंडळी यांचे राजीनामा नाट्य सुरूच आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात (BJP) भाजपच्या गोटात असंतोष पसरला होता. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत एका जाहीर सभेत नेवाळे यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केल होता. त्यानंतर भाजपने आमदार प्रवीण दरेकर यांच्या राज्य सहकार आघाडी सहसंयोजक पदी नियुक्त केलं होते. मात्र तालुक्यातील राजकीय समीकरण बदलत असताना नेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब नेवाळे हे दूध संघाचे अध्यक्ष देखील होते. शेतकरी वर्ग त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे. याचा फायदा नक्कीच आमदार सुनील शेळके यांना होणार असल्याचे चर्चा सध्या मावळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT