Maval News 3 Youth Drowned In Indrayani River 
महाराष्ट्र

Maval News: होळी सणाला गोलबोट, पोहण्याच्या मोहापायी गमावला जीव; इंद्रायणी नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू

Maval News 3 Youth Drowned In Indrayani River: इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. होळीची सुट्टी साजरा करण्यासाठी मावळमध्ये ५ तरुण आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी

राज्यासह देशभरात धुळवड साजरी करण्यात आली. परंतु धुरवडीला दु: खाचं गालबोट लागलंय. मावळ आणि यवतमाळमध्ये हृदय हादरवून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. मावळमधील इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर यवतमाळमध्ये दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनांमुळे परिरसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

होळीच्या सणाची सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांनी आपला जीव गमावलाय. घरकुल येथील ५ तरुण इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झालाय. हे तरुण मावळमधील किन्हई गावात असलेल्या बोडके वाडी बंधारा इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला.

मृतदेह शोधण्याचे काम वन्यजीव संरक्षक मावळ संस्था यांच्याकडून सुरू आहे. त्यातील तीन मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आकाश घोर्डे वय 23, राज आगमे वय 25, आणि गौतम कांबळे वय 24, अशी मृत तरुणांची नावे आहेत. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आलेत.

धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू

यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद येथील धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मावस भावांचा मृत्यू झालाय. धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी ८ तरूण खोरद येथील धरणात होण्यासाठी गेले होते. त्यापैकी ५ जण अचानक बुडायला लागले. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर दोन मावस भावांचा यात बुडून मृत्यू झाला.

बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले असून पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोईर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दरम्यान बोटीच्या सहाय्याने पाच पैकी तिघांना वाचविण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT