Lonavala News
Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News| अंधश्रद्धेचा कळस, स्मशानभूमीतील हे दृश्य बघून सगळेच गेले चक्रावून

दिलीप कांबळे

मावळ : जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असले तरी ग्रामीण भागातील अंधश्रद्धा अद्याप देखील कमी होताना दिसत नाही. आपल्या आजुबाजुला अथवा आपल्याबाबत काही चांगले वाईट घडले की, त्याला अंधश्रद्धेची जोड दिली जाते. याचाच (Maval) फायदा काही भोंदू मंडळी घेत असतात. असाच प्रकार वाकसई गावाच्या वैकुंठ स्मशानभूमीत पहावयास मिळाला. लिंबावर गुलाल, टाचणी टोचलेले लिंबू टोपलीत होते. हा प्रकार पाहून ग्रामस्‍थ भयभीत झाले आहेत. (maval lonavala news superstition seeing this scene in the cemetery)

काही भोंदूबाबा तुमच्याबाबत घडणार्‍या घटनांना हे जबाबदार आहे, ते जबाबदार आहे असे सांगत समोरील व्यक्तीचा विश्वास संपादित करत मंग भरमसाट पैसे उकळले जातात. अनेक वेळा असे प्रकार उघड झालेले असताना देखील नागरिकांवरील अंधश्रद्धेचा आणि बुवाबाजीचा पडगा कमी होताना दिसत नाही. लोणावळ्यात (Lonavala) संत तुकाराम महाराज यांचे पादुकास्थान असलेल्या मंदिरासमोरील वाकसई गावाच्या वैकुंठ स्मशानभूमीत असाच एक प्रकार ग्रामस्तांना पहायला मिळाला आहे. काही ग्रामस्त एका सहामासी कार्यक्रमासाठी स्मशानभूमीत गेले असताना त्याठिकाणी पाटीभरून लिंब पहायला मिळाली. काही लिंब कापलेली होती. त्यामध्ये गुलाल, अबिर भरलेला होता. काही पिना, टाचण्या, नारळ, अन्य काही फळे ठेवण्यात आलेली होती. हा सर्व प्रकार पाहून ग्रामस्त देखील भयभित झाले आहेत.

काही महिन्‍यांपुर्वीही झाला असा प्रकार

मागील काळात देखील या स्मशानभूमीत असे प्रकार घडले होते. आजचा प्रकार मात्र फार भयंकर व मोठा असल्याचे ग्रामस्तांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने तसेच (Anis) अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबतची चौकशी करावी; अशी विनंती केली आहे. मात्र सरपंच पोलिस पाटील यांनाही विश्वासात घेऊन त्यांनाही मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी वेक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who Is KL Sharma: काँग्रेसचे निष्ठावान, सोनिया गांधींचे विश्वासू.. अमेठीतून स्मृती इराणींना टक्कर देणारे के. एल शर्मा कोण?

Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT