सरकार वाचावे यासाठी आघाडीतील नेत्यांचे प्रयत्नच नाही; अनिल गोटे यांचा घणाघाती आरोप

सरकार वाचावे यासाठी आघाडीतील नेत्यांचे प्रयत्नच नाही; अनिल गोटे यांचा घणाघाती आरोप
Anil Gote
Anil GoteSaam tv

धुळे : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर आता या प्रकरणावर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात गोटे यांनी सर्रासपणे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) सर्व नेत्यांवर आरोप लावत कुठल्याही नेत्याने हे सरकार वाचविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे म्हटले आहे. (dhule news Anil Gote allegations maharashtra politics and mahavikas aaghadi)

Anil Gote
Jalgaon: वीज कोसळून दोन महिला ठार; एक जखमी

राज्‍यात सुरू असलेले राजकारण हे न समजणारे आहे. शिवसेनेचेच (Shiv Sena) आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्‍थीर झाले आहे. या सर्व प्रकारावर राष्‍ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्‍यांनी सांगितले, की एकीकडे शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण त्यांच्याबरोबरच असल्याचे दाखवत गोहाटीकडे पलायन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनापासून राजकारण होत नसून खिशापासून हे राजकारण केले जात असल्याचा आरोप देखील गोटे यांनी लावला आहे.

सर्वसामान्‍यांना फायदा काय?

त्याचबरोबर सत्ता बदल झाल्यानंतर देखील राज्यातील नागरिकांना याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नसल्याचे म्हणत गोटे यांनी भाजपची (BJP) सत्ता आली तरी सर्वसामान्यांना याचा कुठलाही फायदा होणार नसल्याचं म्हटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com