Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News : विधानसभेत सुशिक्षित उमेदवार जाऊ दे; मुंबईतील मच्छिमार, कोळी बांधवांचे एकविरा देवीला साकडे

Lonavala News : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बहुतांश मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. यात बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढली असून कोण निवडणार सांगणे सध्यातरी अवघड

दिलीप कांबळे

मावळ : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमधून कोण विधानसभेत जाणार हे अजून तरी सांगणे कठीण आहे. मात्र लोणावळ्यातील आई एकविरा देवीला मुंबईतील मच्छीमार, आगरी व कोळी बांधवांनी सुशिक्षित उमेदवार विधानसभेत जावा अशी प्रार्थना करत देवीला साकडे घातले आहे. 

सध्या विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. बहुतांश मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. यात बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढली असून कोण निवडणार सांगणे सध्यातरी अवघड आहे. दरम्यान नवी मुंबईतील मच्छीमार, आगरी, कोळी बांधव हे (Lonavala) लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक झाले. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात तिरंगी लढत असून सुशिक्षित उमेदवार हा विधानसभेत जावा; असं साकडं आई एकविरा चरणी घालण्यात आले. 

अपक्ष उमेदवाराला दिलाय पाठिंबा 

नवी मुंबईतील मच्छीमार संघटना, आगरी, कोळी बांधव यांनी बेलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांना पाठिंबा दिला असून आई एकविरा मंदिरात त्यांनी ही घोषणा केली. तसेच बेलापूर मतदारसंघातून सुशिक्षित उमेदवारच विधानसभेत जाऊ दे अस साकडं लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चरणी त्यांनी घातले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT