Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

भोंग्यांवरून वाद पेटण्याची शक्यता; मालेगावच्या मौलानांचा मशिदीवरील भोंगे काढण्यास नकार

ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र या अल्टिमेटमला मानण्यास मालेगावच्या (Malegaon) मौलानांनी नकार दिला आहे. ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे देखील पहा -

तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरे हा वाद वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अजान हा नमाजचाच एक अविभाज्य घटक आहे. त्याला वेगळं करता येणार नाही. त्यामुळे अजान होतच राहणार. राज ठाकरेंच्या भूमिकेला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. माईक आणि भोंगे मशिदीवरच राहतील. त्यांना कुणीही बाहेर काढू शकणार नाही", अशी भूमिका मौलानांनी घेतली आहे.

राज ठाकरे सारखे लोक अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्माच्या नागरिकांमध्ये परस्परांप्रती द्वेष निर्माण होतो. तसेच सामाजिक वातावरण खराब होतं. अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, जेणेकरुन पुन्हा कुणी दुसरा व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही, अशी टीका मालेगावच्या मौलानांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT