Narendra Patil, Vinayak Mete Accident Case, Beed saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case : 'त्याच वेळी मेटे साहेबांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल, तोपर्यंत शांत बसू नका'

विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची नागरिकांसह नेते मंडळी सांत्वनपर भेट घेत आहेत.

विनोद जिरे

Maratha Reservation : शिवसंग्राम पुन्हा एकदा ताकतीने उभी राहिली पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल त्याचवेळी खरी श्रद्धांजली मेटे साहेबांना (Vinayak Mete) वाहिली जाईल, तोपर्यंत शांत बसू नका असं माथाडी कामगारांचे नेेते नरेंद्र पाटील यांनी बीड येथे नमूद केले. (Vinayak Mete News)

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली. यावेळी पाटील यांनी मेटे कुटुंबियांशी विविध प्रश्नांवर देखील चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा समाज विखुरला असून त्यास एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली.

पाटील म्हणाले नव्याने स्थापन झालेले शिंदे सरकार मराठा समाजाविषयी गंभीर आहे. आरक्षणा संदर्भात वेळोवेळी बैठका लागतील आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दरम्यान विनायक मेटे यांच्या अपघाता संदर्भात नरेंद्र पाटील यांनी देखील संशय व्यक्त केला. ते म्हणाले या घटनेची चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे. शिवसंग्राम पुन्हा एकदा ताकतीने उभी राहिली पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल त्यावेळी खरी श्रद्धांजली मेटे साहेबांना वाहिली जाईल, तोपर्यंत शांत बसू नका असं पाटलांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT