Dhule Fire
Dhule Fire Saam Tv
महाराष्ट्र

केशरानंद ऑइल मिल सेक्टरला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

भूषण अहिरे

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील बामणी शिवारामध्ये असलेल्या केशरानंद ऑइल मिल सेक्टरला सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. आगीचे कारण अद्यापही कळू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे मिलमध्ये असलेले मशनरी व त्याचबरोबर मिलमधील इतर साहित्य जळून खाक झाले आहेत.

हे देखील पाहा -

या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे जवळपास 20 ते 25 बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जमावानांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचे सामान जळून खाक झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

SCROLL FOR NEXT