Uran News  Saam Tv
महाराष्ट्र

Uran Fire News : उरणमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुराचे लोट आकाशाला भिडले

Uran Fire News : आगीची तीव्रता लक्षात घेता ओएनजीसी, जेएनपीटी आणि उरण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

उरण तालुक्यातील कंठवली गावात आगीची भीषण घटना समोर आली आहे. कंठवली गावातील गव्हाण चिरनेर मार्गावर असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोकांना घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

आग किती मोठी आहे याचा अंदाज यावरुन लागता येईल की दूरवरुनही आग दिसून येत आहे. धुराचे लोट आकाशाला भिडले आहेत.

घटनेची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी आणि उरण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही. मात्र गोडाऊनचं मोठं नुकसान या आगीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT