Melghat Fire Saamt v
महाराष्ट्र

Melghat Fire: मेळघाटातील चाकर्दामधील वस्तीला भीषण आग; संपूर्ण वस्ती जळून खाक

Melghat Fire: मेळघाटातील चाकर्दामधील अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, साम प्रतिनिधी

धारणी तालुक्यातील नागढाना येथील नवी वस्ती चाकर्दा येथे काल रात्री 9 च्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली. या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेत असलेल्या 7 पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत. तर अन्य 2 घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्ती आगीच्या विळख्यात आली. अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय.

या भीषण आगीत घरातील दुचाकी, गॅस सिलेंडर, कपाटातील दागिने, कपडे, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूरही भस्मसात झाली. सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली, त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहे. स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाने त्वरित मदत जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

SCROLL FOR NEXT