solapur, solapur fire news, fire brigade saam tv
महाराष्ट्र

Solapur Fire News : साेलापूरात गादी कारखान्याला भीषण आग, 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या रवाना, 8 लाखांचे नुकसान

गादी कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी नाही.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर शहरात एका गादीच्या कारखान्याला लागलेल्या आगीनंतर सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. नागरी वस्तीतील गादी कारखान्यासह इतर एक दुकानाला आगीने भक्षस्थानी केल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकेल असा अंदाज बांधला जात आहे. (Maharashtra News)

सोलापुरातील (solapur) समाधान नगर येथील गादी कारखान्याला अज्ञात कारणाने आग लागली हाेती. नागरी वस्तीतील गादी कारखान्यासह इतर एक दुकानाला आगीनेे भक्षस्थानी घेतले. या गादी कारखान्याला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 गाड्यातून पाण्याचा मारा करावा लागला.

या गादी कारखाना लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गादी कारखाना लागलेल्या आगीचे मोठे मोठे लोट परिसरात पसरले हाेते. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.

गादी कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी नाही. या गादी कारखान्याचे 5 लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच दुसऱ्या कारखान्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT