Miraj News Saam TV
महाराष्ट्र

Miraj News: प्लास्टिक कारखान्याला भीषण आग; दुर्घटनेत लाखोंचे नुकसान

ही आग आटोक्यात आणण्यासाठी ५ तास अथक प्रयत्न सुरू होते.

Ruchika Jadhav

Miraj News: मकर संक्रांतीच्या पहाटेच मिरज येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास एका प्लास्टिक कारखान्याला आग लागली. यामध्ये कारखान्यातील सर्व प्लास्टिक जळून खाक झाले आहे. प्लास्टिकमुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी ५ तास अथक प्रयत्न सुरू होते. (Latest Miraj News)

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ४ वाहने घटनास्थळी दाखल झाली. तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाची १ आणि कोल्हापूर मनपाची १ यासह तासगाव नगर परिषदेची १ अशी एकूण ६ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र प्लास्टिकमुळे आग आटोक्यात येत नव्हती तसेच धुराचे लोट दूरवर पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी कारखान्यात कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारखाना मालकाचे यात लाखोंचे नुकसान झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने कारखाना मालक हळहळ व्यक्त करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागले

नवीन ड्रायव्हरने घाट मार्गावर वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी?

Signs of liver disease on hands: लिव्हर खराब होत असताना हळूहळू हातांवर दिसून येतात 'ही' लक्षणं; वेळीच बदल ओळखून उपचार घ्या!

Maharashtra Live News Update : गुरुपौर्णिमेला साई चरणी 65 लाख रुपये किमतीचे सोने चांदी, हिऱ्यांचे दान

Peanut Butter Recipe: टेस्टी पीनट बटर खायला आवडतं? मग घरीच बनवा शुगर-फ्री पीनट बटर

SCROLL FOR NEXT