Miraj : मिरजेतील 'त्या' जागेवर नेमका हक्क काेणाचा? वहिवाटधारक की पडळकर, जाणून घ्या काय घडलं आजच्या सुनावणीत

पडळकर यांनी ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे.
Miraj, Gopichand Padalkar, brahmanand padalkar
Miraj, Gopichand Padalkar, brahmanand padalkarsaam tv
Published On

Miraj News : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर (brahmanand padalkar) यांनी जागेचा ताबा घेण्यासाठी पाडलेल्या बांधकाम प्रकरणी आजची (बुधवार) सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. वहिवाट धारकांकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. त्यावर तहसीलदारांनी येत्या एकाेणीस जानेवारीला अंतिम सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. ताेपर्यंत या जागेच्या बाबतीत "जैसे थे"आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. (Maharashtra News)

Miraj, Gopichand Padalkar, brahmanand padalkar
Latur News : लातूरात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून विद्यार्थ्याची सुटका; पुण्यातील तीन युवक अटकेत

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी रातोरात सहा जानेवारीस मिरज शहरातील आठ मिळकती जेसीबीने पाडल्या होत्या. त्यानंतर घटनास्थळी प्रचंड राेष पाहायला मिळाला होता. तसेच तणावाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते. त्यानंतर या सर्व प्रकरणावरून जागेच्या मालकीचा वाद उफाळून आला होता.

Miraj, Gopichand Padalkar, brahmanand padalkar
Cold Wave : थंडीमुळे जनावरांना 'या' राेगाची लागण, शेतकरी धास्तावले; राज्यभरातील दूध उत्पादनावर परिणाम

पडळकर यांनी ही जागा आपली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण तहसीलदारांपुढे गेले. सोमवारी (ता. 9) पहिली सुनावणा झाली. त्यावेळी मिळकतधारकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती.

Miraj, Gopichand Padalkar, brahmanand padalkar
Saam Impact: सरकारला घ्यावी लागली साम टीव्हीच्या 'त्या' बातमीची दखल, शेतकऱ्याला मिळाला न्याय

आज (बुधवार) या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली. आज दोन्ही गटांकडून जागेच्या (place) पुराव्याबाबत मुदत मागण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदार दगडू कुंभार यांनी सुनावणी पुढे ढकलली. त्यांनी आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सुनावणी एकाेणीस जानेवारीला हाेईल अशी माहिती दाेन्ही गटाच्या वकिलांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com