Mahad Fire Saam Tv
महाराष्ट्र

Mahad Fire : महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशलिटी कंपनीला भीषण आग; परीसरात घबराट

अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम

Mahad Fire News : रायगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाड MIDC तील मल्लक स्पेशालीटी या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या कारखान्यातील ईओ प्लांटला ही आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अगीवर (Fire) नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छोटे छोटे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगीचा धुराचे लोट दूरवर दिसत असून परीसरात घबराट निर्माण झाली आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कारखान्यातील ईओ प्लांटला आग लागली असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेला कारखाना हा पाच मजली आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर स्फोट झाला.

आग लागली त्यावेळी चार कामगार उपस्थित होते. त्यातील एक कामगार बाहेर पडला असून इतर तीन कामगार अजूनही आत अडकल्याची असल्याची माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Lado Laksmi Yojana: महिलांसाठी खास योजना! दर महिन्याला मिळतात ₹२१००; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

IND vs SA: रांची वनडेपूर्वी धोनीच्या घरी पोहोचला विराट; स्वतः माहीने चालवली कार

Kitchen Hacks : मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT