Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Fraud Voting : नाशिकमध्येही बनावट व्होटर आयडी; नाव १ ओळखपत्र ३, ठाकरेंच्या शिलेदाराचा पुराव्यासह गंभीर आरोप

Nashik News : नाशिकमध्ये शेकडो बनावट मतदार ओळखपत्रे तयार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाच नावाने तीन व्होटर आयडी आणि महिनेच्या नावावर पुरुषाचा फोटो असलेला व्होटर आयडी सापडल्याने नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये एकाच नावाने तीन बनावट व्होटर आयडी तयार झाल्याचा भंडाफोड.

  • महिला नावावर पुरुषाचा फोटो असलेले मतदार कार्ड समोर आले.

  • शेकडो बनावट कार्ड तयार झाल्याचा संशय, पुरावे निवडणूक आयोगाकडे.

  • दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी, चौकशी सुरू.

Nashik Fraud Voting: नाशिकमध्ये पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. उबाठाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट मतदार ओळखपत्रे तयार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तपासात असे पुरावे समोर आले आहेत की एकाच व्यक्तीच्या नावाने तब्बल तीन वेगवेगळे व्होटर आयडी बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावांनी व्होटर आयडी तयार केले गेले आहेत.

या गैरप्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एका मतदार ओळखपत्रावर नाव महिलेचे असून फोटो मात्र पुरुषाचा आहे. अशा प्रकारच्या विसंगतींमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गांगुर्डे यांनी सांगितले की, हे प्रकार केवळ एक-दोन घटनांपुरते मर्यादित नसून, अशा शेकडो बनावट मतदार कार्डांची शंका व्यक्त केली जात आहे.

योगेश गांगुर्डे यांनी याबाबतचे सर्व पुरावे गोळा करून निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची तयारी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा प्रकार गंभीर निवडणूक गुन्हा असून, अशा बनावट ओळखपत्रांची निर्मिती आणि वितरणात संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिक पातळीवर या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मतदार ओळखपत्र हे केवळ निवडणूक प्रक्रियेसाठीच नव्हे तर सरकारी योजना, बँक व्यवहार आणि ओळख पुरावा म्हणून वापरले जाणारे महत्वाचे दस्तऐवज आहे. अशा परिस्थितीत जर ते बनावट स्वरूपात तयार होऊ लागले, तर लोकशाहीच्या मुळावर घाव बसतो, असे अनेक सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने अशा तक्रारी गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. बनावट मतदार ओळखपत्रांचा वापर करून मतदानात फेरफार होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे निवडणुकीचा निकालही प्रभावित होऊ शकतो. या प्रकरणाचा तपास सुरू राहील आणि लवकरच सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT