Ahmednagar News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. जामखेड तालुक्यात फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात, साम टीव्ही

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. जामखेड तालुक्यात फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली. या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तापमानाचा पारा चाळीशी पार असताना शनिवारी (१३ मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

आगीची माहिती मिळताच, अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. हा स्फोट इतका भयानक होता, की स्फोटामुळे कंपनीच्या भिंतीला भगदाड पडले. स्फोटामध्ये जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

या दुर्घटनेत ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे (वय ४५ रा. घोडेगाव.ता.जामखेड) व झहीर सत्तार मुलानी (वय ३५ रा. तेरखेडा. ता कळंब) यांचा मृत्यू झाला. तर कारखान्याच्या बाजूला थांबलेले दोघे जखमी झाले आहेत. जामखेड शहरातील नगररोडवर पंकज शेळके यांच्या मालकीचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर हा कारखाना आहे.

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास या कारखान्यात कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व झहीर सत्तार मुलानी हे दोघे काम करीत होते. तर इतर दोघे कारखान्याच्या बाजुला थांबलेले होते. त्यावेळी अचानक कारखान्यात स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की त्या इमारतीच्या भिंतीला मोठे भगदाड पडले.

त्यातून धुराचे मोठे लोट बाहेर आले. स्फोटाच्या आवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले. मात्र धुराचे लोट प्रचंड होते शिवाय आतमध्ये अधुनमधुन स्फोटांचे आवाज येत होते. त्यामुळे जवळ जाता येत नव्हते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यांचे पथक तातडीने आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने बचावकार्य व मदत कार्य सुरू केले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली. त्यानंतर आतमध्ये जाऊन पाहिले असता दोन कामगार होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment : UPI पेमेंटवर ५ रुपयांचे शुल्क? पेट्रोल, वीज आणि बिल भरणाऱ्यांनी जाणून घ्या नवे नियम

Healthy hair: लांबसडक आणि मजबूत केसांसाठी रोज खा हे 5 पदार्थ, काही दिवसांत दिसेल फरक

disha salian case : दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट! धडाकेबाज अधिकाऱ्याकडे तपासाची सूत्रे, कोण आहेत सीमा पाहुजा?

Maharashtra News Live Update: ‘एमपीसीबी’तर्फे पुण्यात २०० ठिकाणी ‘वॉच’

Countries that no longer exist: जगाच्या नकाशावरून गायब झालेत हे 7 देश; वाचा काय आहेत कारणं?

SCROLL FOR NEXT