BJP Strengthens Base Ahead of Local Polls Saam
महाराष्ट्र

थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

BJP Strengthens Base Ahead of Local Polls: वसई-विरार, कल्याण-डोंबिवली येथील ठाकरे गट, बविआ, मनसेच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत.

Bhagyashree Kamble

  • भाजप पक्षात इनकमिंगचा धडाका

  • शिवसेना, मनसे तसेच इतर पक्षातील अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

  • भाजपाची मोहीम जोमाने सुरू

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशाकतच मुंबईतील भाजप कार्यालयात विविध पक्षातील नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. वसई येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पालघर माजी जिल्हाध्यक्ष अॅड. नम्रता वैती (ठाकूर), विभाग प्रमुख रवी थालकर, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, डोंबिवली शहर प्रमुख ओमनाथ नाटेकर यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राजन नाईक, आमदार किसन कथोरे, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, महेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, मनोज बारोट, योगेंद्र प्रसाद चौबे, सूर्यकांत वाघमारे, विशाल जाधव, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यांच्या विकासाच्या राजकारणाला साथ देण्यासाठी आज मोठ्या संख्येने विविध पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कल्याण-डोंबिवली येथील मिलिंद म्हात्रे आणि ओमनाथ नाटेकर हे दोघे सामाजिक क्षेत्रात काम करणारे माझे स्नेही आहेत. या दोघांचा भाजपा प्रवेश आनंदाचा क्षण आहे. सहकार क्षेत्रात काम करणारा सच्चा कार्यकर्ता भाजपामध्ये आला'. या शब्दांत रविंद्र चव्हाण यांनी सुभाष पवार यांचे कौतुक केले.

विविध पक्षातील कार्यकर्त्यांना पारदर्शकपणे कारभारासाठी आणि परिसर विकासासाठी साद घातली आणि सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही रविंद्र चव्हाण यांनी केले. आमदार किसन कथोरे म्हणाले की, देशासाठी सांघिक भावनेतून काम करून भाजपाचा विचार तळागाळात पोहोचवून भाजपा मजबूत करण्यासाठी हे सर्वजण प्रयत्न करतील.

माजी मंत्री कपिल पाटील म्हणाले की, सुभाष पवार यांचा प्रवेश हा ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. सुभाष पवार यांच्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागी भाजपाचा विजय होणार. सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल्याचेही ते म्हणाले.

यावेळी सुभाष पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे विकासकामांना गती मिळत आहे. लोकाभिमुख योजनांमुळे सर्व घटकांची उन्नती होत आहे. तालुक्याच्या विकासकामात हातभार लावण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुरबाड येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, मार्केट समितीचे सर्व संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, विविध सोसायट्यांचे चेअरमन, विविध संस्थांमधील पदाधिकारी यांना सोबत घेऊन भाजपा पक्ष संघटना अधिक मतबूत करण्याचा प्रयत्न करू आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा एकतर्फी विजय होईल असा शब्द दिला.

वसई येथील उबाठा गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शहर प्रमुख साधना चव्हाण, ममता चव्हाण, विभाग प्रमुख सुनिता चव्हाण, विभाग अध्यक्ष भाग्यश्री सुतार, विद्या खामकर, राधिका डिसोजा, युवासेना विभाग प्रमुख सुशांत पाटील यांसह अनेकांचा समावेश आहे.

विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसईतून भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये बविआचे युवा नेते किरण नाडर, आनंद पवार, रवी पाल, उबाठा गटाचे शाखाप्रमुख राहूल यादव, दिनेश कुंबेटे. उबाठा गटाचे नायगांवचे शहर प्रमुख आकाश मौर्या, विभाग प्रमुख सागर पाटील, उपशाखा प्रमुख किरण डाके यांसह अनेकांचा समावेश आहे.

मुरबाड येथील उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख रामचंद्र दळवी, तालुका प्रमुख प्रकाश पवार, बाजार समिती सभापती बाळकृष्ण चौधरी, उपसभापती गुरुनाथ झुंजारराव, तालुका सचिव धनाजी दळवी, महिला आघाडी प्रमुख रेखा इसामे, युवा प्रमुख सागर कडव यांसाह अनेकांचा समावेश आहे. डोंबीवलीचे मनसे उपशहर प्रमुख हरिश्चंद्र पराडकर, शाखा प्रमुख सचिन कोर्लेकर, लक्ष्मण नकाते, प्रदीप सागवेकर, हेमंत म्हात्रे, प्रवीण चव्हाण, अॅड. कविता म्हात्रे, शाखा अध्यक्ष गणेश यादव, विभाग अध्यक्ष समीर पाटील यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT