sangli, tasgoan, police, bjp leader anil jadhav saam tv
महाराष्ट्र

BJP : भाजप शहर सरचिटणीस हत्या प्रकरण; शिवनेरी मंडळाचा तासगाव पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चा

रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे (bjp) शहर सरचिटणीस अनिल जाधव (Anil Jadhav) यांची हत्या होऊन सव्वा महिना झाले आहे. मात्र पोलिसांनी (police) अद्याप या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराच्या निषेधार्थ शिवनेरी मंडळानं साेमवारी तासगाव पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चा काढण्यात आला. (Sangli Latest Marathi News)

चार ऑगस्ट 2022 रोजी अनिल जाधव यांच्यावर विश्वासघाताने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्य, वर्चस्ववाद व किरकोळ वादवादीतून जाधव यांची हत्या करण्यात आल्याचे पुढे येत आहे. या हत्येनंतर शहरात असंतोष उफाळला. शहर बंद ठेवण्यात आले, निषेध फेरी, शोकसभा, रास्ता रोको या माध्यमातून शिवनेरी मंडळ व तासगावकरांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शहरातील वातावरण तापले हाेते.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना जेरबंद केले आहे. मात्र, या हत्येचे प्रमुख सूत्रधार असणारे गेल्या सव्वा महिन्यापासून फरार आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यात तासगावचे पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाेलिसांनी तपासात गती आणावी यासाठी साेमवारी तासगावकरांनी पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चा काढला. हा माेर्चा सायंकाळी शिवनेरी चौकातून सुरू झाला. शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT