शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Saam Tv
महाराष्ट्र

शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आयटीबीटीच्या 45 व्या बटालीयन आणि महाराष्ट्रात पोलिसांनी सलामी दिली.

संतोष जोशी

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहीद जवान असिस्टंट कमांडर सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्तीसगड येथे माओवाद्यांच्याशी लढताना शिंदे यांना विरमरण आले होते. आयटीबीटीच्या 45 व्या बटालीयन आणि महाराष्ट्रात पोलिसांनी सलामी दिली.

सुधाकर शिंदे यांच्या 10 वर्षाच्या मुलानं मुखाग्नी दिली. शहीद शिंदे यांच्या पार्थिवावरील तिरंगा झेंडा कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी कुटुंबियांना अश्रु अनावर झाले. अंत्ययात्रेस पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह हजारों नागरीकांनी श्रध्दांजली वाहीली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिंदे यांनी शिक्षण पुर्ण करुन २००१ मध्ये आयटीबीटी विभागात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले.

२०१९ मध्ये छत्तीसगड राज्यात नक्षली प्रतिबंधक पथकात नियुक्ती झाली. शिंदे यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरयाणा, पंजाब सिमेवर सेवा बजावली आहे. शिंदे यांच्या पश्चात आईं, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. शहीद जवान सुधाकर शिंदे यांना अखेर चा निरोप देण्यासाठी जिल्हा भरातून हजारों नागरिक आले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT