विवाहित तरुणीला जिवंत जाळले; पती, सासू-सासऱ्यासह पाच आरोपींना पोलीस कोठडी Saam Tv News
महाराष्ट्र

विवाहित तरुणीला जिवंत जाळले; पती, सासू-सासऱ्यासह पाच आरोपींना पोलीस कोठडी

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील नवविवाहित तरुणीच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोविंद साळुंखे

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील नवविवाहित तरुणीच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडी येथील माहेर असलेली नवविवाहित पूजा लोंढे या तरुणीचा विवाह कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील निखील विलास म्हेञे यांच्यासोबत पाच महिन्यांपूर्वी झाला होता. (Married young woman burned alive; accused remanded in police custody)

हे देखील पहा -

सुरवातीला काही दिवस आनंदाचे गेले परंतु नंतर मात्र तिचा नेहमी सासरच्या लोकांकडून छळ केला जात असे. वारंवार त्रास देऊन घर बांधण्यासाठी व इतर काही वस्तू घेण्यासाठी तिचा छळ होत होता. अशातच तिच्या नवऱ्याचं अफेअर असल्याचं तिला समजल्यावर खूप मोठा वाद झाला, त्यानंतर नवरा, सासू- सासरे, दीर यांनी तिला मारहाण करून जाळून टाकले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पती विलास म्हेत्रे सासू, लता म्हेत्रे, सासरा विलास म्हेत्रे, दीर स्वप्नील म्हेत्रे, जाव रेखा म्हेत्रे या आरोपींना पोलिसांनी अटक करून कलम 304, ब 498, अ 323,504 (43) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास कोपरगांव पोलिस करत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thama: खूनी प्रेम कहानी...; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा थरार, रश्मिका मंदानाचा ग्लॅमर, 'थामा'चा जबरदस्त टिझर प्रदर्शित

Maharashtra Rain Live News: वसई- विरारमध्ये पावसाचा कहर, रस्ते पाण्याखाली

Dangers of expired medicine: एक्सपायरी झालेली औषध घेतली तर काय होऊ शकतं? जाणून घ्या ही औषधं फेकण्याची योग्य पद्धत

Sachin Pilgaonkar : 'आम्ही सातपुते' हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनी का केला? स्वतः खुलासा करत म्हणाले...

Sangali Accident : सांगलीत एसटी बस आणि कंटेनरची भीषण धडक; देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांचा अपघात

SCROLL FOR NEXT