Marathwada Water Storage Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Water Storage : बिंदुसरा प्रकल्प 100 टक्के, जायकवाडी किती? एका क्लिकवर वाचा मराठवाड्याचा पाणीसाठा

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्याच्या पाणीसाठ्यासंदर्भात ऑगस्ट महिनेच्या अखेरीस मोठं अपडेट समोर आलंय. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे संभाजीनगर, जालना शहरांसोबत उद्योग, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटला आहे. शिवाय जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून पाणीही सोडणे सुरू झाले आहे.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा किती?

सध्या ३६ हजार क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा शंभरीकडे वाटचाल करीत आहे. यंदा मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावलीय. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस (Marathwada water storage) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. यामुळे मराठवाड्यावाला पाणीसंकटापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे जलसाठ्यांच्या पाणीपातळीत देखील चांगली वाढ झालीय.

बीड जिल्ह्यातील पाणीसाठा

बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प देखील ओव्हर फ्लो झालाय. त्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न देखील मिटलाय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच प्रकल्प ओव्हरफ्लो झालं असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून बिडमध्ये पावसाची संततधार सुरू होती, यामुळे पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं समोर आलंय.

बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झालाय. यामुळं आता बीड शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून परिसरातील पाली, करचुंडी, कर्जनी, धानोरा यासह अन्य गावांना याचा फायदा होणार (Bindusara project) आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. दरम्यान यामुळं बीड शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT