Marathwada Teacher Constituency Election: सूर्यकांत विश्वासराव यांनी आतापर्यंतच्या निकलात जोरदार मुसंडी मारली आहे.
Marathwada Teacher Constituency Election: सूर्यकांत विश्वासराव यांनी आतापर्यंतच्या निकलात जोरदार मुसंडी मारली आहे. SAAM TV
महाराष्ट्र

Suryakant Vishwasrao: कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव? मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मारली जोरदार मुसंडी

माधव सावरगावे, औरंगाबाद

Marathwada Shikshak Matadarsangh Nivadnuk: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या निकलात सूर्यकांत विश्वासराव यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. एकीकडे महाविकासआघाडीचे विक्रम काळे दुसरीकडे भाजपचे उमेदवार किरण पाटील रिंगणात असताना सूर्यकांत विश्वासराव यांनी दुसऱ्या क्रमांची मते मिळवली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मते मिळवणारे सूर्यकांत विश्वासराव नेमके आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव?

सूर्यकांत विश्वासराव यांना मराठवाडा शिक्षक संघाने उमेदवारी दिलेली आहे. सूर्यकांत विश्वासराव यांचा जन्म १ जून १९६४ रोजी कंधार तालुक्यातील धर्मापुरी येथे झाला. १९८८ साली शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरळा येथील शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशी ३५ वर्षे सेवा बजावली आणि नंतर निवृत्त झाले.

सूर्यकांत विश्वासराव हे २००३ ते २००८ या काळात मराठवाडा शिक्षक संघाचे कंधार तालुकाध्यक्ष होते, त्यानंतर २००८ ते २०२२ या काळात नांदेड जिल्हाध्यक्ष बनले. गेल्या वर्षी २०२२ मध्ये त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले विश्वासराव यांनाच संघटनेने शि बिनविरोध उमेदवारी देखील जाहीर केली.

पहिल्या पसंतीची १३,५४३ मते मिळवली

मराठवाडा शिक्षक संघाची स्थापना २९ जानेवारी १९६७ रोजी झाली. संघटनेचे जाळे मराठवाडाभर पसरलेल्या मराठवाडा शिक्षक संघाने यावेळच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली आणि ही संघटना ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना पहिल्या पसंतीची १३ हजार ५४३ मते मिळाली आहेत.

मराठवाडा शिक्षक संघाने ५ वेळा मिळवला होता विजय

मराठवाडा शिक्षक संघाने यापूर्वी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळवला होता. प. म. पाटील आणि पी. जी. दस्तूरकर हे मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार होते. परंतु २००४ मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या विजयाची परंपरा खंडित केली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिला. मात्र यंदा शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाचा शिरकाव नको म्हणून मराठवाडा शिक्षक संघाने निवडणुकीच्या रिंगणात सर्व ताकद पणाला लावली.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांना 35 मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांची संख्या 20 हजार 113 झाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना पाचव्या फेरीअखेर 20 मते मिळाली. आता त्यांच्या मतांची संख्या 13 हजार 569 झाली आहे, तर भाजपचे किरण पाटील तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना पाचव्या फेरीअखेर 18 मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या मतांची संख्या 13 हजार 515 इतकी झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT