Zila Parishad School Student Saam Tv
महाराष्ट्र

Zila Parishad School: मराठवाड्याची शिक्षणव्यवस्था मठ्ठ? झेडपीच्या शाळेत मराठीची बोंब

Zila Parishad School Student : मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणव्यवस्थेच तीन तेरा वाजलेत. येथील विद्यार्थ्यांना साधं मराठी वाचता येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच मराठी वाचता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्हा परिषदेच्या 29 टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क मराठीही वाचता येत नाही. गणित आणि इंग्रजी भाषा तर या विदयार्थ्यांपासून कोसो दूर आहे. ही धक्कादायक बार प्रशासनाच्या अहवालातून समोर आलीय .पाहूयात काय आहे हा अहवाल?

शिक्षणाच्या आयचा घो!

30% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाही

चौथीतल्या 29% मुलांना 99 पर्यंतचं संख्याज्ञान नाही

इयत्ता पहिलीच्या 33% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, नांदेडमध्ये प्रमाण सर्वाधिक

दुसरीतल्या 70% विद्यार्थ्यांनाच वाचन करता येतं

वाचता न येणाऱ्या तिसरीतल्या मुलांचं प्रमाण 28%

दुसरी, तिसरीतल्या 24% मुलांना 10 पर्यंतचे अंक मोजता येत नाही

43 विद्यार्थ्यांना लहान लहान शब्दही लिहिता येत नाहीत

मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या 12,285 शाळांमधलं सर्वेक्षण

शिक्षण विभागाने मराठवाड्यातील झेडपीच्या शाळांबाबत वास्तव उघड केल्यानंतर साम टीव्हीनेही थेट शाळांना भेट देत रिअॅलिटी चेक केलीय.. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचंच समोर आलंय. मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचं भीषण वास्तव समोर आलं. त्याचं खापर मंत्री शिरसाटांनी शिक्षकांवर फोडत कारवाईचा इशारा दिलाय.

राज्यातील ग्रामीण शिक्षणाचं जळजळीत वास्तव या निमित्ताने समोर आलं आहे. आता खरी गरज आहे ती बंद होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकवणं आणि गुणवत्तेच्या दृष्टीने मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची. तरच पुढच्य पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल नाही तर ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलंच,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाची आढावा बैठक सुरू

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

SCROLL FOR NEXT