
येता जाता रस्त्यांच्या बाजूला नर्सरी, पहिली, दुसरी अथवा पाचवीपर्यंतच्या प्रवेशाच्या जाहिराती पाहायला मिळतात. त्या जाहिरातीच्या अनुषंगाने तुम्ही त्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला नर्सरी, किंवा पहिलीला प्रवेश घेताय ? तर सावधान ! आपल्या मुलांना नर्सरी, पहिली किंवा कोणत्याही इयत्तेसाठी प्रवेश घेण्यापूर्वी शाळांची चौकशी करूनच प्रवेश घ्या; अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
अशीच फसवणूक पुण्यातील हडपसर मधील पालकांची झाली आहे. हडपसर परिसरामध्ये मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आहे. या स्कूलला यु-डायस नंबर चुकीचा असल्याचा पालकांनी शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिलं. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, कँटोन्मेंट बोर्डासह महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या आहेत.
या शाळांमधून 'आयसीएसई', 'सीबीएसई' आणि 'आयबी'; तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत सध्या प्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे. सध्या शाळांच्या प्रवेशाबाबतच्या अनेक जाहिराती सुरू झाल्याचे दिसत आहे. त्या जाहिरातींच्या माध्यमातून पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी शाळांची इत्थंभूत माहिती घेऊन आणि खात्री झाल्यानंतरच पाल्याचा शाळेत प्रवेश घ्यावा.
चुकीची जाहिरात करून पालकांची फसवणूक केल्यास आणि पालकांच्या निदर्शनास आल्यास त्या संबंधित संस्था अथवा शाळेच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिला आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील गटशिक्षणाधिऱ्यांनी त्या शाळांच्या कृतीकडे दुर्लक्ष केल्यास त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असेही नाईकडे यांनी स्पष्ट केले आहे. तर हडपसरमधील मॅरेथॉन स्कूल वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
त्या संदर्भात रस्त्यांच्याकडेला अथवा मोठमोठ्या संस्थांच्या बाहेर जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्या फ्लेक्सवर आकर्षक जाहिराती करून पालकांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. त्या फ्लेक्सच्या जाहिरातीमुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी १६ ते १८ डिसेंबरदरम्यान, www.zppune.org या वेबसाइटवर शाळांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अनधिकृत शाळेत प्रवेश होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
शाळेत प्रवेश घेताना शाळेला सरकारची मान्यता आहे का, याची तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी; तसेच महानगरपालिका, नगरपालिका पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे खातरजमा करावी.
शाळेला 'यू डायस नंबर' आहे का?
प्रथम मान्यता, शाळेचे bhखेळाचे मैदान, स्वच्छतागृहे आहेत का?
शाळांमध्ये भौतिक सुविधा आहेत का?
शाळांमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत का?
पालक-शिक्षक समिती स्थापन केली आहे का?
विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेत महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे का?
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का? असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून कडून सर्वेक्षण करून अनधिकृत शाळांचा शोध घेण्यात येणार आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.