Marathwada connection of recruitment scam Saam TV
महाराष्ट्र

भरती घोटाळ्याचे मराठवाडा कनेक्शन; तब्बल 31 मास्टर माईंड्स अडकले जाळ्यात! (पहा Video)

टीईटी, आरोग्य भरती, म्हाडा आणि पोलीस भरती घोटाळ्यामध्ये मराठवाडा कनेक्शन स्ट्रॉंग असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: टीईटी, आरोग्य भरती, म्हाडा आणि पोलीस भरती घोटाळ्यामध्ये मराठवाडा कनेक्शन स्ट्रॉंग असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय. दोन-चार नव्हे तर मराठवाड्यातील तब्बल ३१ मास्टर माईंड्स पोलिसांच्या हाती लागलेत. या मास्टरमाईंडसोबत अनेक सरकारी अधिकारी- कर्मचारी, घोटाळ्यात आर्थिक देवाणघेवाण करणारे दलाल आणि यात आपलं उखळ पांढरं करून घेणारे महाभाग आता पोलिसांच्या रडारवर आहेत. (Marathwada connection of recruitment scam)

राज्यात नोकर भरती संदर्भात खळबळ उडवून देणाऱ्या आरोग्य विभाग भरती, टीईटी म्हाडा आणि पोलीस भरती परीक्षेच्या घोटाळ्यात मराठवाड्यातील तब्बल २९ जणांना अटक करण्यात आलीय. यातले अर्ध्याहून अधिक आरोग्य विभाग भरती, टीईटी म्हाडा आणि पोलीस भरती घोटाळ्यात सहभागी आहेत. या घोटाळेबाजानी बीड, औरंगाबाद हे सेंटर ठेऊन घोटाळ्याची व्याप्ती साऱ्या महाराष्ट्रात पसरवली. यात बीडमधून १२, औरंगाबादमधून ११ आणि जालन्यातून ५ जणांना अटक करण्यात आलीय. काही जण फरार आहेत आणि काही जण तपासणीनंतर अटकेच्या रडारवर आहेत.

आरोग्य भरती घोटाळ्यामध्ये;

उध्दव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकट बडगीरे, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के,राजेंद्र पांडुरंग सानप, नामदेव विक्रम करांडे, संजय शाहुराव सानप, विजय नागरगोजे आणि या आठवड्यात पकडला गेलेला अतुल राख हे सगळे बीड जिल्ह्यातले. हे आरोपी खरे सूत्रधार आहेत. आरोपी संजय सानप याचा आरोग्य विभागात काम करत असणारा भाऊ जीवन सानप यांचा शोध सुरू आहे.

तर टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याला तर म्हाडा परीक्षेच्या घोटाळ्यात राहुल किसन सानपसह आणखी एकाला अटक करण्यात आलीय. ( recruitment scam)

पहा व्हिडीओ-

औरंगाबाद कनेक्शन :

औरंगाबाद शहरातून सुरुवातीला संतोष लक्ष्मण हरकळ आणि त्याचा भाऊ अंकुश रामभाऊ हरकळ या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली.

त्यानंतर औरंगाबाद शहरातून टार्गेट अकॅडमीचा अजय नंदु चव्हाण, सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे या तिघांना म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणी अटक केल्यानंतर मराठवाड्यातील मोठे धागेदोरे समोर आले. हे तिघे म्हाडासोबतच आरोग्य भरती आणि टीईटी घोटाळ्यातही सहभागी आहेत.

त्यानंतर म्हाडा आणि आरोग्य भरतीतीळ परीक्षा घोटाळ्यात या आठवड्यात अर्जुन राजपूतला अटक करण्यात आली. इतकंच नाही तर नागपूर आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री तालुक्यातील ६ जणांना अटक केलीय.

बीड कनेक्शन :

घोटाळ्याचा बीड पॅटर्न यानिमित्तानं समोर आलाय. बीड जिल्ह्यातून तब्बल १२ आरोपींना अटक करण्यात आलीय.

जालना कनेक्शन :

आरोग्य भरती घोटाळ्यात सुरुवातीच्या टप्प्यात जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये संतोष बरवाले, राजू भुहुरे,सुनील बहुरे, प्रदीप सुलाने, सूरज जारवाल या पाच जणांना अटक करण्यात आली.

त्यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटी घोटाळ्या प्रकरणी प्राध्यापक सुनील कायंदे चौकशी केली.तेव्हापासून प्राध्यापक सुनील कायंदे आणि दिलीप जायभाय हे फरार असल्याचं सांगितलं जातंय.

औरंगाबाद, बीड आणि जालन्यात या घोटाळ्याची पाळेमुळे असल्यानं पुणे पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलंय, त्यामुळे या घोटाळ्यातील घोटाळा बहाद्दरांचे आकडेच डोळे दिपवणारे असतील. कारण टीईटी परीक्षा पास होण्यासाठी पैसे देणारे आणि घेणारे हात खूप आहेत.

मराठवाड्यातल्या या मास्टरमाईंडसोबत काही सरकारी अधिकारी, कर्मचारी, त्यासोबत राज्यभर विखुरलेले दलाल आहेत. त्यांच्याकडून कोट्यवधींचा व्यवहार तर झालायचं, शिवाय त्यांनी ही व्यवस्थाच पोखरून काढलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात हजारो घोटाळ्यांचे चेहरे मराठवाड्यातून समोर येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT