Jayakvadi Dam  Saam TV
महाराष्ट्र

उन्हाचा पारा वाढल्याने मराठवाडा चिंतेत; बाष्पीभवनाने पाणी पातळीत घट

उन्हाचा पारा वाढल्यामुळे मराठवाड्यातील धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: उन्हाचा पारा वाढल्यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे. मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या जायकवाडी धरणासह प्रमुख प्रकल्प आणि धरणांमध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे.

यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे सर्व धरण आणि प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा असल्यामुळे चिंता नव्हती. मात्र, या उन्हाळ्यात बाष्पीभवनाने चिंता वाढवायला सुरुवात केलीये. आणखी एक महिन्याचा काळ पावसासाठी असल्यामुळे धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठा हा तळाला जातो की काय अशी भीती वाटत आहे.

सध्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) ५६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत ४५ टक्के, लघु प्रकल्पांत ३१ टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ टक्के, इतर बंधाऱ्यांत ८९ टक्के जलसाठा सध्या आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लघु आणि मध्यम प्रकल्पांत बऱ्यापैकी साठा आहे.

मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पात ५९.५२ टक्के जलसाठा आहे, तर ६५ मध्यम प्रकल्पात ४५.२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे.

मराठवाड्यातल्या ७४९ लघु प्रकल्पात ३१.६१ टक्के जलसाठा आहे.

गोदावरी नदीवरच्या १५ बंधाऱ्यात ४७.९८ टक्के जलसाठा आहे तर इतर २५ बंधाऱ्यात ८९.१४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे आज घडीला मराठवाड्यातील एकूण ८७५ प्रकल्पात ५१.९५ टक्के जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी हा साठा ६० टक्‍क्‍यांच्यावर होता, आता मेमध्ये यात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT