Today's Marathi News Live By Saam TV  Saam TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस

Maharashtra Political Breaking News 17th July 2024 : आज आषाढी एकादशी, पंढरपुरात विठ्ठलाचा जयघोष, जाणून घेऊयात मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Satish Daud

IAS Pooja Khedkar: पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस

पुणे पोलिसांकडून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस पाठवण्यात आलंय. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे आदेश आहेत. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले होते. याच बाबतीत वाशीम पोलिसांनी त्यांची तक्रा नोंदवली होती. पूजा खेडकर यांचा जबाब पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती वर्ग

याच चौकशी साठी पूजा खेडकर यांना हजर राहण्याचे पुणे पोलिसांची नोटीस

Mumbai-Goa Highway:  मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा २ दिवसासाठी मेगाब्लॉक

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या दोन दिवस दिवसातून 4 तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आलीय. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्ग उद्या गुरुवारी आणि परवा शुक्रवारी दुपारी बारा ते चार असा एकूण ४ तास बंद राहणार असल्याची माहिती मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी नुकतीच दिलीय.

Mumbai Transport: मुंबईतील वाहतुकीसंदर्भात मोठी बातमी! शीव (सायन) उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद

शीव (सायन) पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल मध्य रेल्वे प्राधिकरणाने धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे, शीव (सायन) उड्डाणपुलावरून अवजड वाहने आणि २.८० मीटरपेक्षा उंचीच्या वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आलीय. तसेच दिनांक १७ जुलै २०२४ रोजी मोहरम सणानिमित्त वांद्रे, कुर्ला, धारावीसह अन्य भागातून मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात नागरिकांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या भागातील मार्गांवरुन प्रवास करणे टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Maratha Reservation : उद्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक

मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीच्या पूर्वतयारीसाठी बैठक होणार आहे. उद्या बैठकीनंतर शांतता महारॅलीची तारीख जाहीर होऊ शकते. २० तारखेला जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा सरकारला इशारा दिलाय.

Kolhapur Vishalgad:  विशाळगड अतिक्रमण; १९ जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा

विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेविरोधात कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे सांगितलं आहे. मात्र आता एमआयएमच्या कोल्हापुरातील या मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू तसेच या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.

Gadchiroli : गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; सी-60 दलाचे पोलीस उपनिरीक्षक जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस स्टेशन अंतर्गत छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात गडचिरोली पोलिसांचे C-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास चकमक उडाली. या चकमकीत सी-६० पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. चकमकीत जखमी झालेल्या उपनिरीक्षक सतीश पाटील यांना घेऊन हेलिकॉप्टरने कांकेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचे नक्षलविरोधी अभियान सुरू असून या चकमकीत काही नक्षलवादीही जखमी झाल्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तवली आहे.

 NCP: नवाब मलिकांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट

आमदार नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. मंत्रालयासमोर असणाऱ्या कार्यालयात तिन्ही नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगल्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. दोन दिवसा आधीच पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान नवाब मलिक आमच्यासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी केला होता.

IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या वडिलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये 2022 मध्ये दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आहे 296/2022 असा या गुन्ह्याचा एफआयआर क्रमांक असून या गुन्ह्यात दिलीप खेडकर यांच्यावर भारतीय दंडसंहिता 1960 कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे अद्यापही हा न्यायप्रविष्ठ असून याबाबत दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याचा उल्लेख केलेला आहे.

IAS Pooja Khedkar Case: पुणे ग्रामीण पोलिसांच्या तीन पथकाकडून मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू 

पाथर्डीसह मुंबईतील दोन ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मनोरमा खेडकर यांचा अद्यापही पत्ता लागलेला नसल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिलीय. पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील दुसऱ्या स्टील प्रकल्पाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

गडचिरोली जिल्ह्यात आज दुसऱ्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. सुरजागड इस्पात लिमिटेड या स्टील प्रकल्पाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम ,राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले आहे.

Solapur : सोलापुरात मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापुरात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिरासमोर युवकने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वतः च्या हातावर ब्लेडच्या साहाय्याने वार करून हा युवक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता.

Pimpri-Chichwad Politics: पडझडीनंतर अजित पवारांनी बोलवली आजी माजी नगरसेवकांची बैठक

शहरातील पक्षाच्या पडझडी नंतर अजित पवार यांनी बोलावली आजी माजी नगरसेवकांची बैठक. पुण्यात नवीन सर्किट हाऊसला सकाळी 8 वाजता बैठक होणार आहे. पक्ष संघटना टिकवण्यासाठी उपाय योजनांवर होणार चर्चा. शहराध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा होणार आहे.

koynanagar earthquake : कोयना नगर परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना नगर परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे, अशी प्राथिमक माहिती हाती आली आहे.2. 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. दुपारी ३.२६ वाजताच्या सुमारास ही भूकंपाची घटना घडली.

vishalgad controversy : विशाळगड हिंसाचारावरुन नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विशाळगड हिंसाचारावरुन राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात दंगलखोरांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघ नखे मुंबईत दाखल

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघ नखे मुंबईत दाखल आहेत.

पुरातत्व विभाग आणि कस्टम विभागाकडून वाघ नखे मुंबईत आणण्यात आली

लंडन येथील व्हिक्टोरिया संग्रहालयातील ही वाघनखे मुंबईत आणण्यात आली.

varun sardesai :  वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा रंगली आहे.

वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्व मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु असल्याचं बोललं जात आहे.

वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्व मतदारसंघात सामाजिक उपक्रमास सुरुवात झाली आहे.

वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई असा सामना रंगणार असल्याचं बोललं जात आहे.

वरुण सरदेसाई हे मोर्चेबांधणी करत असले तरी मविआमध्ये जागावाटप झालेलं नाही.

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात अखेर पावसाची बॅटिंग; शेतकरी सुखावला

भंडारा जिल्ह्यात आज अखेर पावसाने हजेरी लावली.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती.

शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले परे वाळण्याची वेळ आली होती.

शेतकरी टँकर द्वारे पाणी देत असतानाचे विदारक दृश्य पाहायला मिळाले होते.

तर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

अखेर आज भंडाऱ्यात पाऊस बरसल्याने शेतकरी आनंदी आहे.

Nagpur News : नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकारिणी बरखास्त

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप प्रभाग कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभा क्षेत्रात नियुक्त केलेले 370 बूथ प्रमुख 105 शक्ती प्रमुख युवा वरीयर, पन्ना प्रमुख यांना बरखास्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीत गडकरी यांचे मताधिक्य घटल्याने पक्षाने निर्णय घेतला आहे.

Vasai Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघे जखमी

वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सातीवली खिंड येथे गुजरात लेनवर ट्रेलरचा भीषण अपघात झाला. टेम्पो आणि ट्रेलरच्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. सकाळी ११ वाजता अपघाताची ही घटना घडली. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

Gadchiroli News: राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने प्रवास करताना थोडक्यात बचावले

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात सुदैवाने बचावले. खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली.

Kolhapur News: संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चेला उधाण

संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चेला उधाण आले आहे. स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवर पोस्ट व्हायरल होत आहे. हिंदू पदपात शहा असा संभाजी राजेंचा उल्लेख करण्यात आला आहे. विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त मोहिमेनंतर स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरून संभाजी राजेंचा हिंदू पदपात शहा असा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू पदपात शहा म्हणजेच हिंदूंचा सर्वोच्च राजा असा अर्थ होतो.

Ajit Pawar: अजित पवार यांची नागपूरात होणारी बैठक रद्द

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूरात होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. नागपूरमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार होती. ही बैठक काही कारणास्तव अचानक रद्द करण्यात आली.

Mira Bhayandar: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तांना धमकी, पोलिसात गुन्हा दाखल 

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांना धमकी आलीये. ५ लाख रुपये द्या अन्यथा वरिष्ठाकडे तक्रार करून मित्र परिवारात बदनामी करणार अशी धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअप आणि मेलवरून धमकी देण्यात आली आहे.

Navi Mumbai:  नवी मुंबईतल्या वाशी गावातून एक किलो वजनाचे ड्रग्ज जप्त, दोघांना अटक 

नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. नवी मुबंईतील वाशी विभागातून एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सायन -पनवेल महामार्गावर वाशीगाव बसस्टॉप जवळ सापळा रचत 1 किलो 4 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. तब्बल 2 कोटी 80 हजार रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान सलाउद्दीन शेख आणि फजल खान या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

Sharad Pawar:  अजित गव्हाणे यांच्या प्रवेश सोहळ्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया 

मला माहीत नव्हतं की, माझी ओळख जादुगार म्हणुन करुन दिली जाईल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. मोदी बागेत अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश झालाय. त्यानंतर शरद पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: जम्मू - काश्मीरातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

जम्मू - काश्मीर मधील डोडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौक येथे आज दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून जखमी जवानांच्या प्रकृतीसाठी यावेळी प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

Akola Rain: अकोल्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

अकोला जिल्ह्यात काल रात्री झालेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अकोल्यातल्या आगर आणि पाळोदी गावाचा देखील संपर्क तुटला आहे. मोर्णा नदीला आलेल्या पूरामूळे आगर आणि पाळोदी गावाच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

Pune News: पूजा खेडकर प्रकरण; घराबाहेरील अतिक्रमण महानगरपालिकेने हटवलं

पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलीय. पूजा खेडकर हिच्या बाणेर येथील घराच्या बाहेरील अतिक्रमण महानगरपालिकेने हटवलं. महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस लावलीय.

Pune Breaking: अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश झालाय. पुण्यातील मोदी बागेत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक उपस्थित होते.

Pune News: पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील मुख्य पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आज शरदचंद्र पक्षात प्रवेश होत आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील मुख्य पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात पक्षप्रवेश सोहळ्याला सुरूवात होणार आहे.

Nana Patole: नाना पटोलेंनी घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट

नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली आहे. ७ आमदारांवर १९ जुलैच्या आधीच कारवाईची मागणी करण्यात आलीय. कारवाई करुन पक्षात कडक संदेश देण्याची मागणी केली जातेय.

Sindhudurg News: आंबोली घाटातील वाहतूक पूर्ववत

आंबोली घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत झालीय. सकाळी आठच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध डोंगराचा भला मोठा दगड आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर अडीच तासांनंतर जेसीबीच्या साहाय्याने हा भला मोठा दगड बाजूला केला गेला.

Dharashiv News: तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा नोंदणी 21 जुलै पासून सुरु होणार

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा नोंदणी 21 जुलै पासून सुरु होणार आहे. भाविकांनी ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी, असं आवाहन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Palghar News:  पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील  2,600 पेक्षाही अधिक पदे रिक्त

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य राम भरोसेच असल्याचं उघड झालं आहे . एकट्या पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची तब्बल 2,600 पेक्षाही अधिक पद रिक्त आहेत .

Mumbai News: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्टमध्ये होणार

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्टमध्ये होणार आहे. साम टीव्हीला सूत्रांकडून माहिती मिळत आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमुळे, महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. अखेर ऑगस्ट महिन्यात ही नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळते.

Shivaji Maharaj Wagh Nakh : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवरायांची वाघनखं उद्या महाराष्ट्रात येणार

महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडन येथील असलेली बहुप्रतिक्षित वाघनखं उद्या महाराष्ट्रात आणली जाणार आहे. सायंकाळी ही वाघनखं सातारा येथे नेली जाणार आहे.

लंडनमधल्या व्हिक्टोरीया ॲंड अल्बर्ड म्युझियमच्या स्वत:च्या खासगी सुरक्षेत वाघनखं साताऱ्यात येतील. विशेष विमानाने वाघनखं साताऱ्यात दाखल होतील. १९ जुलै रोजी राज्य सरकारच्या वतीने भव्यदिव्य असं सोहळ्याचे साताऱ्यात आयोजन करण्यात आलंय.

Nashik News : नाशिकमध्ये विठ्ठल मंदिरात भाविकांची तुफान गर्दी

आषाढी एकादशी निमित्त नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालीय. ज्या भाविकांना पंढरपूरला जाऊन दर्शन घेता येत नाही, अशा भाविकांनी दर्शनासाठी या मंदिरात गर्दी झाली आहे.

आलेल्या भाविकांसाठी मंदिरात प्रसादाची व्यवस्था करण्यात आलीय. तसच आज मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं असून जवळपास 36 वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात तूप साखरे परिवाराकडून या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती.

तेव्हापासून प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते.

Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप

नंदूरबार जिल्ह्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहादा शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे. बुधवारी पहाटे सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील कोर्ट परिसरात रस्त्यांना नदीचे स्वरूप. नगर पालिकेने नाले सफाई न केल्याने गटारी झाल्या ब्लॉक झाल्या आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Shirdi News : आषाढी एकादशीनिमित्त साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

पंढरपूरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भक्तीत तल्लीन झालेले असताना साईबाबांच्या शिर्डीतही आषाढीचा उत्साह बघायला मिळतोय. साईभक्ताच्या देणगीतून समाधी मंदिर आणि परीसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून साईमुर्तीला तुळशीपत्राचा हार घालण्यात आलाय.

Amboli Ghat News : आंबोली घाटातील रस्त्यावर कोसळला भलामोठा दगड

आंबोली घाटातील रस्त्यावर कोसळला भलामोठा दगड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. आज पहाटेच्या सुमारास आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या काही अंतरावर हा दगड कोसळला. सध्या आंबोली घाटातून एकेरी वाहतूक सुरू. काही वेळात जेसीबीच्या सहाय्याने दगड हटवला जाणार.

Mumbai News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटींच्या घरात आहे. तर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५ लाख रुपयांचं परदेशी चलन देखील जप्त करण्यात आले आहेत. कस्टम्स विभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

Shirdi News : आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईभक्तांसाठी 12 टन खिचडीचा महाप्रसाद

सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येत आहे.. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन आज साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत..आषाढी एकादशी निमित्ताने साई प्रसादालयात भाविकांसाठी खास 12 टन साहित्य वापरून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय..

Nashik News : नाशिक शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

- नाशिक शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

- डेंग्यूच्या रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता उशिराने का होईना पालिकेच्या आरोग्य यंत्रणांना जाग

- डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शहरात डेंग्यू डासांच्या उत्पत्ती स्थळांची शोध मोहीम

- डेंग्यू उत्पत्ती स्थळासाठी संबंधितांना आता प्रति स्पॉट ५०० रुपये दंड तर बिल्डरांना १० हजार रुपये दंड

- ४९२ जणांकडून डेंग्यू उत्पत्ती स्थळासाठी १ लाख १३ हजारांचा दंड वसूल

- डेंग्यू उत्पत्ती स्थळ शोधून कारवाईसाठी मलेरिया विभाग, आशा सेविकांसह जवळपास ७०० जणांचं पथक कार्यान्वित

Washim News : माझी लाडकी बहीण योजनेसाठी वाशिम जिल्ह्यातील ८५ हजार महिलांनी भरले अर्ज

:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून २३ हजार २८८ ऑनलाईन व ६२ हजार २१७ ऑफलाईन असे एकुण ८५ हजार ५०५ महिलांनी सदर योजनेचे अर्ज भरले आहे.

यात वाशिम तालुक्यातील १८ हजार २९० रिसोड तालुक्यातील ८ हजार ७३६, मालेगाव तालुक्यातील ९ हजार ८०८, मंगरूळपीर तालुक्यातील ८ हजार ५७१, कारंजा तालुक्यातील ३० हजार ५०१, मानोरा तालुक्यातील ७ हजार ३९१, वाशिम शहरी भागातील २ हजार २०८ अर्ज भरले आहेत.

Ulhasnagar News : उल्हासनगरच्या प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरात आषाढीची पूजा

उल्हासनगरच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय. आज सकाळी कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपरिवार बिर्ला मंदिरात विठ्ठलाची पूजा केली. सेंच्युरी रेयॉन कंपनीने बांधलेलं हे मंदिर अनेक वर्षे जुनं असून आषाढी कार्तिकीला ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, असे भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येतात.

आज पहाटे कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा आणि आरती केली. देशात सुख, समृद्धी राहावी, तसंच बळीराजावरील संकट दूर व्हावं, बळीराजा सुखी राहो अशी प्रार्थना विठुरायाला केल्याचं विश्वास गुजर म्हणाले.

Pandharpur News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. आज जवळपास 15 लाखांहून अधिक भाविक वारीसाठी दाखल झाले आहेत. पंढरीत नगरीत विठु नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

दरम्यान आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT