Maharashtra Live News Update : Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: चांदवड तालुक्यातील मेसण्या डोंगराला आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यातील राजकीय घडामोडी, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध, पाकिस्तान-अफगाणिस्तान हल्ला, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

चांदवड तालुक्यातील मेसण्या डोंगराला आग

नाशिकच्या चांदवड-मनमाड रस्त्यावरील चांदवड तालुक्यातील मेसण्या डोंगराला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली असून,आग लावल्याने मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ पसरले आहे,आग लावण्याचे प्रकार दरवर्षी घडत असते,आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचे नुकसान व्हायची शक्यता आहे अजून देखील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी कोणीही या ठिकाणी आग विझवण्यासाठी उपस्थित नाही.

हिंदु राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं विधान

.मढीच्या जत्रेतला मुस्लिम समाजाकडून हिंदूनी खरेदी करू नये हा मुद्दा तापला असताना आज त्याचीच री ओढत भाजपचा राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी किल्ले शिवनेरीवर वादग्रस्त विधान केले आहे. जागा विकताना कोणाला विकता,नारळ फुलवाले,गरब्यात डान्स करणारे,खोटा खोटा टिळा लावणारे या सगळ्यांची पाठीमागच्यांची रूप रेखा पाहून कोणाकडुन खरेदी करायचे हे ठरवा.तरच आपण वाचणार आहोत.

चिमुकल्या विद्यार्थिनीने विधान परिषद सभापती राम शिंदे यांची उलट तपासणी करत घेतली शाळा..

कल्याण मुरबाड रोड सिंडीकेट परिसरात आतिष खान कंपाउंड पारवाणी चाळीत बाईक चोरी

बाईक चोर CCTV कॅमेरात कैद ,तीन बाईक सुरू करण्याचा प्रयत्न फसला एक बाईक चोरी करून गेला ...

महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

हातात मेणबत्या घेत हजारो महिलांसह नागरिक रस्त्यावर

- भारत नागपाल हत्याकांडच्या दोषींना कठोर शिक्षेची मागणी

- वर्धा जिल्ह्याच्या पुलगावं येथील उद्योजक भारत नागपाल हत्याकांड,चंद्रपूर जिल्ह्याच्या बांबर्डा येथे झाली होती हत्या

- आरोपीना फाशीची शिक्षासह तपास सीआयडी कडे देण्याची मागणी

डोंबिवलीत कार पेटवून देणारी टोळी सक्रिय?सीसीटीव्ही फुटेजमुळे शहरात खळबळ

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड, सागाव परिसरात एका उभ्या कारला आग लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणारे रोहित रमेश सरोज यांची १० लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी अर्टिगा MH 05 FV 1998 कार दोन अज्ञात इसमांनी जाणीवपूर्वक पेटवून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित सरोज यांनी नेहमीप्रमाणे ५ मार्चच्या रात्री ८ वाजता आपली गाडी इमारतीच्या खाली पार्क केली होती. ६ मार्च रोजी पहाटे ३:१८ च्या सुमारास शेजाऱ्यांनी फोन करून गाडीला आग लागल्याची माहिती दिली. रोहित यांनी खाली धाव घेतली असता गाडीच्या मागील बाजूने भीषण आग लागल्याचे दिसून आले. तात्काळ ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.

​सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत - नितेश राणे

जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत असून याबाबत आढावा शासनामार्फत घेण्यात आला.

शासनाकडे याचा अहवाल आला असून हवामानातील बदलांमुळे पिकावर परिणाम झाला असून ८५ टक्के पिक नुकसान झाले आहे.

शासनाकडे याचा अहवाल देण्यात आला आहे.

आपल्याकडे अवकाळी पाऊस, फूल कीड, बुरशी याचा प्रादुर्भाव फळवर होतो.

अचूक हवामान माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात येईल. फुलोरा, फळधारण, किड, औषध व्यवस्थापन, मातीची आर्द्रता यांचा अभ्यास होईल.

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीत कलगीतुरा

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. "जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे अध्यक्ष आमचाच व्हावा ही आमची ठाम भावना आहे. जर समन्वयातून तोडगा निघाला नाही, तर अध्यक्षपदासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू," अशा स्पष्ट शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची आक्रमक भूमिका मांडली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांच्या मतदार संघात केलेल्या घुसखोरी वरून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजी व्यक्त केली होती यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधान केले आहे.

Maharashtra Live News Update : नाशिक जीएसटी लाच प्रकरण; १ कोटींच्या मागणीचा गुन्हा, तीन अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी 

नाशिकमध्ये जीएसटी विभागातील लाच प्रकरण उघडकीस आले आहे. मुंबई एसीबीने 20 लाखांची लाच घेताना एक सहायक आणि दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना अटक केली. बांधकाम व्यावसायिकावरील कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात 1 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. तिघांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजासाठी देशपातळीवर लढा सुरु - मंत्री संजय राठोड 

राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता देशपातळीवर आरक्षणाची लढाई सुरू असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे.

परभणीत तापमान 37.6 अंशावर, वर्ध्यात ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा ईशारा 

परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासुन उष्णतेत वाढ झाली आहे.आज जिल्ह्याचे तापमान हे 37.6 अंशावर गेले आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात या तापमानाची नोंद झाली असुन मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान वाढीने परभणी करा चांगलेच हैराण झाले.

एलपीजी सिलेंडर मोठी दरवाढ, ग्रामीण भागात ग्राहकांची गर्दी...

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पूर्वीच्या दराच्या तुलनेत सिलेंडरच्या किमतीत तब्बल ६० रुपयांची वाढ झाली असून आता घरगुती एक सिलेंडर ९१६ रुपयांना मिळत आहे. दरवाढीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

बदलापूर स्टेशनबाहेर महिलांमध्ये जोरदार हाणामारी 

बदलापूर स्टेशनबाहेर एका दुकानात दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. या दोन्ही महिला दोन वेगवेगळ्या दुकानात काम करणाऱ्या महिला आहेत. शौचालयाच्या चावीवरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली

बेगमपुऱ्यात वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना CCTV मध्ये कैद 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा काही अज्ञात तरुणांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.

शॉर्ट सर्किटमुळे चार एकर शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे शेतशिवारात विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागून चार एकरांतील काढणीला आलेला गहू जळून खाक झाल्याची घटना दुपारी घडलीये.

नाशिक-विंचूर येथे भीषण वाहतूक कोंडी

नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथे आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सध्या या मार्गावर एकेरी रस्तावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक कोंडीची झाली आहे गेल्या तीन ते चार तासांपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे दोन किलोमीटरहुन अधिक लांब वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे विंचूर येथे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असल्याने कांदा आणि धान्याच्या वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच आज लग्नसराईचा हंगाम असल्याने प्रवासी आणि खासगी वाहनांचीही मोठी गर्दी झाली आहे. या सर्व कारणांमुळे नाशिककडे तसेच येवला आणि लासलगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून कोंडी फोडण्याचे काम सुरू आहे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना बराच वेळ रस्त्यावरच अडकून राहावे लागत असल्याने नियोजित स्थळी जाण्यासाठी वेळ लागत आहे

वायुसेनेचे पायलट पूर्वेश दुरुगकर यांचे पार्थिव शरीर त्यांच्या निवासस्थानी दाखल

वायुसेनेचे पायलट पूर्वेश दुरुगकर यांचे पार्थिव शरीर त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

वायुसेनेच्या जवानांनी “पूर्वेश अमर रहे” अशा घोषणांत पार्थिव शरीर आणले.

कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शोकाकुल वातावरणात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जेएनपीए बंदरात 4192 कंटेनर अडकले

युद्धाचा परिणाम सध्या जेएनपीए बंदरावर देखील पाहायला मिळत आहे. जेएनपीए बंदरात 4192 कंटेनर अडकले आहेत. तसेच पंधराशे कंटेनर हे नाशवंत पदार्थ त्याचे देखील अडकले आहेत. युद्धामुळे खरतर हे कंटेनर अडकले आहेत. शिपिंग कंपनीचा देखील शिपिंग करण्यासाठी नकार पाहायला मिळत आहे. आठ शिप देखील अडकले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलार कंपनीच्या रोबोटीक प्लांटचं भुमिपुजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलार कंपनीच्या रोबोटीक प्लांटचं भुमिपुजन

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडकडून सुमारे २२३ एकर क्षेत्रात युनीट

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा

युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

जागतिक स्तरावर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील भोर - महाड मार्गावर भीषण अपघात

पुण्यातील भोर - महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर कोंढरी गावाच्या हद्दीत, भरधाव कार रस्त्याकडेच्या चारित जाऊन पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी नाही

कारमधील चौघे जण किरकोळ जखमी झालेत.. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे

लोकल वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी 2 वाजून 11 मिनिटांची लोकल बदलापूर स्थानकातच रखडली.

Weather Update: पुढील दोन दिवस वर्ध्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच सूर्य आग ओकू लागलाय.वर्धा जिल्ह्याचे तापमान सतत वाढत असून पुढील दोन दिवस जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर निघणे टाळावे अस आवाहन प्रशासनाने केले आहे.

Nanded: मेडिकलच्या विद्यार्थीनीच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरुध्द ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड शहराजवळच्या सिडको भागातील एका खाजगी होस्टल मध्ये 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षा गायकवाड असं मयत तरुणीचं नाव आहे.हडको येथील महाविद्यालयात बी. एच . एम. एस द्वितीय वर्षात ती शिकत होती.तिच्या आत्महत्या प्रकरणी सिडको येथील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात भटक्या कुत्र्याने पुन्हा एकदा घेतला एका व्यक्तीच्या चावा

पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने पुन्हा एकदा एका व्यक्तीवर हल्ला करत त्याचा पायाचा चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याचे टोळकं व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्या पायाचा चावा घेत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भटक्य कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी योग्य प्रकारे केली नसल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा असा अशी मागणी पिंपरी चिंचवडकर करत आहेत.

Nashik: इस्रायल- इराण युद्धाचा फटका, हॉटेलमधील जेवण आणि मद्यसेवन महागणार

अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा फटका हॉटेल व्यावसायिकांना

हॉटेलमधील जेवण आणि मद्यसेवन महागणार

नाशिक जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट्स आणि बार असोसिएशनने बोलावली तातडीची बैठक

सोमवारी नाशिक जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट्स आणि बार असोसिएशनची बैठक

दर वाढवण्यासंदर्भात तसंच अडचणींबाबत बैठकीत होणार चर्चा

युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाल्याचे परिणाम जाणवण्यास सुरुवात

नाशिक जिल्ह्यात या आठवड्यातच वाढणार जेवणाचे दर

-२० ते ३० टक्क्यांनी वाढणार जेवणाचे दर

खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा..

नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका माथेफिरू तरुणाने थेट उभी असलेल्या रेल्वेच्या डब्याच्या छतावर चढून हायव्होल्टेज ओव्हरहेड वायरजवळ धिंगाणा घातल्याने काही काळ स्थानकावर एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरत-भुसावल मार्गावरील पॅसेंजर गाडीच्या छतावर चढलेल्या या तरुणामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने त्या मार्गावरील विद्युत पुरवठा बंद केला. रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी जवळपास अर्धा ते एक तास प्रयत्न केल्यानंतर संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश मिळवले.

डीजे नाही, तर हातात झाडू घेऊन साजरी केली शिवजयंती...अंबागड किल्ल्यावर जांबच्या शौर्यमित्रांनी राबविली स्वच्छता मोहीम

संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या, मात्र भंडारा जिल्ह्यातील जांब येथील 'शौर्यमित्र बहुद्देशीय संस्थेने' एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक अंबागड किल्ल्यावर जाऊन संपूर्ण गड परिसराची स्वच्छता करत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. मोहिमेची सुरुवात गडपूजनाने झाली. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भंडारा विभागाच्या सहकार्याने किल्ल्यावरील कचरा साफ करण्यात आला. महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी महिलांनी 'शिवभजन' सादर करून वातावरण शिवमय केले. केवळ स्वच्छताच नाही, तर उपस्थित तरुण आणि विद्यार्थ्यांना शिवरायांचे गड-संवर्धनाचे विचार सांगून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.

केडीएमच्या उद्धव सेनेच्या त्या तीन नगरसेवकांना पक्षाचा अंतिम इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत उद्धव सेनेकडून निवडून आलेल्या त्या तीन नगरसेवक कोणत्याही गटा सामील झालेले नसल्याने त्या नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांनी करावी. याबाबतचा खुलासा येत्या ४८ तासात संबंधित नगरसेवकांनी पक्षाकडे करावा अन्यथा त्यांचे पद रद्द करण्याची ही अंतिम नोटिस पक्षाकडूने देण्यात आल्याच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

परभणीत इंस्टाग्राम स्टोरीवरून गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगावात तरुणाला मारहाण

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील एक तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द पिताश्री ऑफ ऑल इस्लामीक पातशहा’ अशा आशयाची पोस्ट टाकली होती ज्यामुळे मुस्लिम समुदायाच्या ८ ते ९ जणांनी या तरुणाला मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली आहे ज्यामुळे राणीसावरगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्यासह इतर अधिकारी रात्रभर राणीसावरगाव येथे तळ ठोकून होते या प्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून जवळपास ९ जनावर पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी आज राणीसावरगाव बंदची हाक देण्यात आली आहे.गावात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन पोलीस लक्ष ठेवून आहेत

कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाच्या झळा भारतातही दिसू लागल्यात.. घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला असून व्यासायिक गॅस सिलिंडर वितरणाला सरकारने मज्जाव केलाय.. मात्र रुग्णालयांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची गरज पडत असल्याने हे सिलेंडर द्यायचे की नाही? असा प्रश्न वितरकांना पडलाय.. सरकारकडून अद्याप ठोस गाईडलाईन आल्या नसल्याने वितरकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.. सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर बाबत गाईडलाईन सुनिश्चित कराव्यात अशी मागणी वितरकांनी केली आहे.

धाराशिवच्या वाशीमध्ये मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाशी शहरातील कळंब रस्ता येथील चौकात मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराज यांचा सुमारे सहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवला

या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध गुन्हा

दाखल,घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता

संबंधित चौकाच्या नामकरणाबाबत मागील अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण असल्याची माहिती

सदर पुतळा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बसवण्यात आला असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची तक्रार,त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मुंब्रा फायरिंग घटनेचा सीसीटीव्ही फूटेज आला समोर

ठाण्यातील मुंब्रा येथील अल्मास कॉलनी या ठिकाणी मध्यरात्री फायरिंग ची घटना समोर आलेली आहे.. या घटनेमध्ये फेमस युट्युबर नदीम खान यांचा वर फायरिंग करण्यात आली सुदैवाने याचात थोडक्यात नदीम खान बचावले आहे... मुंब्रा मध्ये झालेली फायरिंग घटनेचा CCTV footage समोर आला आहे आपण पाहू शकतो अंधाधुंद गोळीबार करण्यात अलीचा दिसून येत आहे... ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी शहजाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद वय २८ वर्षीय याचा कडून २ रिव्हॉल्वर आणि ४ मॅगझिन एकंदरीत ५०–६० पुंगली जब्त केली आहे

अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे नाराज असलेल्या रावदेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. कपिल रावदेव हे अकोला शहरातील काँग्रेसचे जुने, निष्ठावंत आणि वैचारिक फळीतील प्रमुख नेते समजले जातात. काँग्रेसमधला ब्राह्मण समाजातला प्रमुख आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून कपिल रावदेल यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहेय. काँग्रेसने सातत्याने डावल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं रावदेव यांनी स्पष्ट केलय.

नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

त्रेतील टेंडर दुसऱ्याला दिल्याच्या कारणावरून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात घडला आहे.. भाजपचे नगरसेवक तथा सुजय विखे यांचे निकटवर्तीय दहरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.. राहाता शहराचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला असून तुपे यांच्या फिर्यादीवरून तुषार सदाफळ नामक व्यक्तीसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत यापूर्वी ८५६ रुपये होती. त्यामध्ये ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरची नवीन किंमत ९१६ रुपये झाली आहे. तसंच कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत यापूर्वी १७८४ रुपये होती. त्यामध्ये ११५ रुपयांची वाढ करण्यात आली असून आता कमर्शियल गॅस सिलेंडरची नवीन किंमत १८९९ रुपये झाली आहे.

अमरावतीत पहिल्याचं आठवड्यात पारा 40 अंशाच्या उंबरठ्यावर,  अमरावतीत पारा 39. 8 अंशावर

विदर्भात उन्हाळ्यात सर्वाधिक उष्ण तापमान राहते, फेब्रुवारी महिना समताच अमरावती शहर व संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.. मार्च महिन्याच्या पहिल्यादाचं तापमान आणि रोद्र रूप धारण केले आहे अमरावतीत पारा 39.8 अंशावर गेला आहे, आज अमरावतीत चाळीस अंश पार तापमान करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे,मागील 14 वर्षात मार्चच्या पहिल्या आठवड्यात इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली नव्हती.

त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक तापमान अमरावतीसह विदर्भात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, दुपारीच अमरावती शहरात काही रस्त्यावर गर्दी कमी बघायला मिळाली,तर रसवंती, लिंबू शरबत आणि मलाई लस्सी,ताक केंद्रावर नागरिकांच्या गर्दी वाढल्या आहेत

मुक्ताईनगरमध्ये इंदोर महामार्गावर भूसंपादनाच्या बांधीत शेतकऱ्यांचा महामार्गावरच लोटांगण आंदोलन

भूसंपादनाच्या योग्य मोबदला मिळावा म्हणून मुक्ताईनगरमध्ये इंदोर महामार्गावर भूसंपादनाच्या बांधीत शेतकऱ्यांचा महामार्गावरच लोटांगण आंदोलन...लोटांगण आंदोलन करत शेतकरी झाले आक्रमक....भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या आम्ही जमिनी द्यायला तयार शेतकऱ्यांची भूमिका....महामार्गावर एक तास पाच किलोमीटर पर्यंत वाहतुकीच्या लांबच लांब रांगा वाहतुकीचा खोळंबा...मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सरकारचा निषेध नोंदवला मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

अत्याचारास विरोध केल्याने महिलेचा गळा दाबून खून,आरोपीला अटक

हडपसर-सासवड रस्त्यालगत वडकी येथे अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हे शाखेने उलगडा केला.

लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर संतापातून आरोपीने महिलेचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात समोर आले असून,आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीमुळे पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.

येथील पुरातन विठ्ठल मंदिराला मुळस्वरुप प्राप्त व्हावेयासाठी राज्य शासनाने भारतीय पुरात्त्वविभागाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. याकामासाठी 73 कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. या निधीतून मुख्यमंदिरातील कामे पूर्ण केली आहेत. अजून काही कामे प्रगतीपथावरती आहेत. उर्वरित कामांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या कामातून मंदिरातील बालाजी मंदिर, नामदेव पायरी सुशोभीकरण आदींसह इतर कामे केली जाणार आहेत.

भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅस या कंपन्यांकडून गॅस वितरण करणाऱ्या डिलर्ससोबत आज सकाळी १० वाजता ऑनलाईन तातडीची बैठक बोलावण्यात आलीय

सध्याच्या परिस्थितीत गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या गॅस साठ्याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच उपलब्ध साठा अधिक काळ पुरावा यासाठी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

या विषयावर चर्चा अपेक्षित. ....!

- सिलेंडर वितरणावर मर्यादा

- २१ दिवसांनंतरच नवीन सिलेंडर वितरण

- बुकिंगवर वेटिंग लागू होण्याची शक्यता

- डिलर्सना मर्यादित स्टॉक देणे

- गॅसचा तुटवडा टाळण्यासाठी काटकसरीने पुरवठा करण्यावर भर दिला जाणार

- मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवून ठेवण्यावर निर्बंध

सांगली.. जिल्ह्यातील दोन लाखावर शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य.. 62 हजार थकबाकीदार तर दीड लाख नियमित कर्जदार..

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांनी 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केला.. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 90% हून अधिक पीक कर्ज वाटपात सांगली जिल्हा बँकेचा वाटा आहे.. 30 सप्टेंबर 2025 अखेर जिल्हा बँकेचे 61 हजार 761 शेतकरी थकीत असून त्यांची थकबाकी एक हजार कोटी 24 लाख इतकी आहे.. नियमित कर्जदारांची संख्या एक लाख 47 हजारावर आहे. तसेच जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांना अटी शर्तीच्या आदीन राहून सुमारे 1200 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना आता निकषांची प्रतीक्षा आहे. बँकांनी तीन महिन्यापासून माहिती संकलन सुरू होती. ही माहिती शासनाने तयार केलेल्या पोर्टल वर भरण्यात येत आहे.

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरली

- सुरगाण्यात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका

- सुरगाणा तालुक्यात सलग सौम्य भूकंपाचे धक्के

- उंबरठाण परिसरात तीन-चार दिवसांपासून धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीती

- निवरापाडा, चुली, राशा, गुही, उंबरठाण, गोंडाळविहीर परिसरात धक्के जाणवले

- जमिनीतून मोठा आवाज येऊन घरातील पत्रे व वस्तू हलल्याची नागरिकांची माहिती

- काही घरांतील भांडी-कुंडी खाली पडल्याची घटना

- काही ठिकाणी धक्क्यांचा कालावधी १ ते २ सेकंद

- राशा गावाजवळील डोंगर भागातून आवाज येऊन जमीन हादरल्याची माहिती

- वारंवार धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण

- परिसरात भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीच्या नावाखाली शुद्ध फसवणूक

निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करतात तर दुसरीकडे फक्त दोन लाखांची मदत देत असल्याने मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीच्या नावाखाली शुद्ध फसवणूक केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले मात्र मागच्या प्रोत्साहनाचे पन्नास हजार रुपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नसून त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटने कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

दोन लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज;“सातबारा कोरा करा”ची जोरदार मागणी

धाराशिव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी “सातबारा कोरा करावा” अशी मागणी करत सरकारला दिला इशारा

अनेक वेळा शेतकरी जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतो,त्यामुळे तो ‘चालू बाकीदार’ म्हणून नोंदवला जातो आणि कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहतो

जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सध्या चालू बाकीदार असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार

यामुळे चालू बाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही जास्तीत जास्त अनुदान देऊन दिलासा द्यावा, अन्यथा हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे

सर्व शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,शेतकऱ्यांचा इशारा

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी

हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे.

कुंडलिक गुलाबराव जाधव (वय ४०, रा. महंमदवाडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

एका अल्पवयीन मुलीवर २७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.

लातूरमध्ये बनावट सही शिक्क्याने पदोन्नती, शिक्षकासह मुख्याध्यापकावर गुन्हा

लातूरच्या खरोसा येथील नवभारत विद्यालयातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांने पदोन्नतीसाठी बनावट सही शिक्याचा वापर करून बढती घेतल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शिक्षण संस्थेचे बनावट सही शक्य तसेच सेवा जेष्ठता डावलत, मुख्याध्यापक स्वामी आणि शिक्षक बिराजदार या दोघांनी संगनमताने संस्थेचा खोटा ठराव घेत संगणमताने पदोन्नती घेतल्याचे निष्पन्न झाले, न्यायालयाच्या आदेशाने या दोन्ही शिक्षकांवर लातूरच्या किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली.. जिल्हा परिषद सत्ता तिढा...राष्ट्रवादी अजित पवार पक्षात व्हीप वरून अंतर्गत संघर्ष !

सांगली जिल्हा परिषदेत मध्ये सत्तेत महायुती की महाविकास आघाडी याचा तिढा सुटलेला नाही.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेवर सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे.सत्तेच्या गणितासाठी असणारा व्हीप कोण बजावणार यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाली आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या ऐवजी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्या राजेश्वरी नाईक यांच्याकडे व्हीप बजावण्याचा अधिकार देण्यात आले होते,मात्र ते अधिकार माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे देण्याची भूमिका माजी खासदार संजयकाका पाटील,माजी मंत्री अजित घोरपडे व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख ,माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी महायुतीच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली आहे,तर संजयकाका पाटील गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडुन सांगण्यात येत आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे व्हीप मोडल्यास कायदेशीर कारवाई होणार असा इशारा दिला होता, त्यामुळे व्हीप कोण बजावणार यावरून

राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

सांगली जिल्हा परिषदेत मध्ये सत्तेत महायुती की महाविकास आघाडी याचा तिढा सुटलेला नाही.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेवर सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे.सत्तेच्या गणितासाठी असणारा व्हीप कोण बजावणार यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाली आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या ऐवजी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्या राजेश्वरी नाईक यांच्याकडे व्हीप बजावण्याचा अधिकार देण्यात आले होते,मात्र ते अधिकार माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे देण्याची भूमिका माजी खासदार संजयकाका पाटील,माजी मंत्री अजित घोरपडे व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख ,माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी महायुतीच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली आहे,तर संजयकाका पाटील गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडुन सांगण्यात येत आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे व्हीप मोडल्यास कायदेशीर कारवाई होणार असा इशारा दिला होता, त्यामुळे व्हीप कोण बजावणार यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.पंढरपुरातील रिंगरोड साठी 218 कोटींची तरतूद

पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे.‌या रिंग रोड साठी 218 कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वाखरी-टाकळी-अनवली-मुंढेवाडी असा रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. शिवाय शहरातील ठाकरे चौक ते टाकळी रोड या मार्गावर उड्डाण पूल उभारण्यात येणार यासाठी 50 कोटी 16 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर रोडवरील चंद्रभागा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी 45 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी 60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंढरपूर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी सुमारे 501 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे अशा माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

....

भूम परंडा वाशी या 3 तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

आमदार तानाजी सावंत यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भूम परांडा वाशी या 3 ही तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून भूम परांडा वाशी या तिन्ही सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार सभापती म्हणून विजयी झाले आहेत या मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी सह इतर पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणुकीत उतरले होते या तिन्ही तालुक्यात सावंत यांनी पंचायत समितीवर निर्वाद वर्चस्व मिळवत आपली सत्ता स्थापन करत गड काबीज केला आहे.परांडा पंचायत समिती येथे अर्चना जाधव तर उपसभापती पदी परसु गवारे यांची निवड तर भूम तालुक्यातील अटीतटीच्या निवडीत वंचित बहुजन आघाडीच्या उपसभापती रणबागुल ह्या विजयी झाले आहेत तर सभापतीपदी पूजा ढगे यांची निवड झाली आहे तर वाशी पंचायत समिती सभापती पदी प्रणिता गायकवाड उपसभापती पदी नितीन रणदिवे यांची निवड झाली आहे.पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला.

रायगडच्या वहूर गावातील महिला मंडळाने घेतला क्रांतीकारी निर्णय

रायगडच्या महाड तालुक्यातील वहुर गावच्या उगवती वाडीवरील महिला मंडळाने लग्न कार्याबाबत महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे. लग्ना समारंभात मोठा खर्च हा कापड आहेर म्हणजेच बस्ता बांधण्यावर होतो. यामध्ये यजमान्यांकडून पाहुणे आणि नातेवाईकांना साड्या आणि कापड खरेदी होते. यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो तर उटणे आणि हळदी समारंभात चिकन, मटण आणि दारू देखील दिली जाते यावर देखील मोठा खर्च होतो तर वादाचे प्रसंग घडतात. अधिकचा खर्च आणि चुकीच्या प्रथा बंद करण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे पालन न करणाऱ्या लग्न घरात महिला मंडळ मदत करणार नाही असा देखील निर्णय घेण्यात आला आहे. शिमग्याच्या निमित्ताने ग्रामस्थ तसेच चाकरमानी यांच्या उपस्थितीत महिलांनी मिटींग घेत हा निर्णय घेतला असून ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महिला दिनी अवघ्या पाचशे रुपयांत सहल

पी एम पी ची खास भेट आठ पर्यटन मार्गावर बससेवा

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे महिला आणि पर्यटन साठी विशेष भेट जाहीर केली आहे.

स्वारगेट मुख्य व स्थानकावरून येत्या आठ मार्च रोजी आठ प्रसिद्ध पर्यटन मार्गावर विशेष वातानुकूलित ई बस सेवा सोडण्यात येणार आहेत.

अवघ्या पाचशे रुपयांत पर्यटकांना दिवसभर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांची सफर करणार आहे.

पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना धार्मिक ऐतिहासिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेता यावा यासाठी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे.

पुण्यात आता बांधकामांना वेळेची मर्यादा

अभियंता कार्यालयाचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी

शहरातील मोकळ्या जागांवर होणाऱ्या नव्या बांधकामासह पुनर्विकास करताना 24 तास बांधकामे केली जात आहे.

त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता बांधकामांसाठी बारा तासांची मर्यादा निश्चित करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.

सकाळी आठ ते रात्री आठ वेळेतच बांधकामे करता येतील असा प्रस्ताव शहर अभियंता यांनी तयार केला असून आयुक्ताच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

अकोल्याच्या विमानतळ विस्ताराला येणार वेग, धावपट्टीचा विस्तार 1400 वरून 1800 मीटरवर...

राज्यात अर्थसंकल्पात अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याचा उल्लेख झालाय, हे काम आणखी गतिमान होणार आहे. धावपट्टी विस्तार 1400 वरुन 1800 मीटर होण्यासाठी मागीलवर्षी 208 कोटी 76 लाख मंजूर झाले आहे. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी विमानतळ विस्तारीकरणावर भाष्य केल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहेय. हे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित प्रवासी वाहतूक शक्य होणारेये. त्यामुळं अकोलेकरांचे हवाई प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणारेये..

भरदिवसा बिबट्याचे दर्शन; झाडावर चढून शेतकऱ्याने वाचवला जीव, परिसरात दहशत.

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील काकडे वस्ती जवळील शेतकरी खंडू लोंढे यांच्या शेत मजुर रोहित पारधी हे बाजरी पिकाला पाणी देत असताना. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक समोर दोन बिबट्या दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत जवळच्या झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली असून शेतात काम करण्यासही नागरिक घाबरत आहेत. वनविभागाने तातडीने या भागात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

नागपूर - राऊळगाव स्फोटप्रकरणात मृतांचा आकडा २० वर 

- दुर्गा सेवतकर या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यु.

- काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल लिमिटेड दारूगोळा कारखान्यात १ मार्चला झाला होता भीषण स्फोट.

- घटनेत सुरुवातीला १९ कामगारांचा मृत्यू झाला होता.

- त्या स्फोटात सुमारे ६० टक्के भाजल्या होत्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

- सध्या ३० ते ७० टक्के भाजलेल्या १६ महिला कामगारांवर उपचार सुरू.

- त्यापैकी एक रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर असून दोन जणांची प्रकृती गंभीर.

- घटनेनंतर पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संगठन (PESO) ने कंपनीचा परवाना निलंबित केला.

सहा वर्षापासून ग्राऊंडेड असलेल्या एअर इंडियाच्या बोईंग 777 ने पुन्हा घेतली आकाशात झेप

- नागपूरात गेल्या सहा वर्षांपासून एअर इंडियाचे बोईंग 777-300 ईआर हे विमान ग्राऊंडेड होते

- एअर इंडियाच्या एमआरओ मध्ये दुरुस्ती आणि देखभाल पूर्ण झाल्यानंतर या विमानाचा शुक्रवारी नागपूर ते अहमदाबाद टेस्ट फ्लाईट घेण्यात आली

- या टेस्ट फ्लाईट दरम्यान सर्व तांत्रिक चाचण्या करण्यात आल्या आणि कोणतेही त्रुटी आढळता विमान पुन्हा नागपूर विमानतळावर सुरक्षित उतरले

- सहा वर्षे जमिनीवर असलेले हे मोठे विमान पुन्हा उडवणे अत्यंत आव्हानात्मक होते

- पुढील काही दिवसात हे विमान पुन्हा एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे

विद्यापीठात सिनेट बैठकीत गाजला BBA-BCA फीवाढीचा मुद्दा

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत फी वाढीवरून खडाजंगी झाल्याची चर्चा

- BBA आणि BCA अभ्यासक्रमांच्या फी तिप्पट वाढीवर प्रश्न

- वरिष्ठ सिनेट सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी निर्णयप्र क्रियेवर प्रश्नचिन्ह केले उपस्थित

- मे २०२५ मध्ये काढलेल्या फीवाढ परिपत्रकावर घेतला आक्षेप

- AICTE निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा आरोप, शिष्यवृत्ती प्रक्रिया आणि पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित

- हा निर्णय त्या वेळच्या बोर्ड ऑफ डीन आणि शुल्क निर्धारण समितीचा असल्याचं विद्यापीठाचा कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचे स्पष्टीकरण,

- प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन, समितीत डॉ. राजेश भोयर, अॅड. मनमोहन बाजपेयी आणि अजय अग्रवाल यांचा समावेश

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

- मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

- विदर्भात उन्हाचे चटके वाढले....

- अमरावतीमध्ये मोसमातील उच्चांक की तापमानाची नोंद, नागपूरच्या पाऱ्याची वाटचाल चाळीशीकडे

- अमरावतीचं कालचं तापमान 40.8 अंशावर

- नागपूरच्या तापमानात 1.2 अंशाची वाढ होऊन 38.7 अंशावर

- अकोला 40.7 अंश, वर्धा 40 अंश, ब्रह्मपुरी 39.2 अंश, चंद्रपूर 39.2 अंश, वाशिम 39 अंश यवतमाळ 39 अंश

- विदर्भातील सर्वच शहरांमध्ये उन्हाचे तीव्र चटके

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT