Maharashtra Live News Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : म्हाडातर्फे ‘डिजीम्हाडा’ मोबाईल अॅपचे लोकार्पण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक ५ मार्च २०२६, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध, पाकिस्तान-अफगाणिस्तान हल्ला, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

म्हाडातर्फे ‘डिजीम्हाडा’ मोबाईल अॅपचे लोकार्पण

वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात कार्यक्रम

उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना म्हाडाच्या विविध सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध

ई-बिलिंग, तक्रार निवारण, ई-लिलाव, सोडतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा

माहितीचा अधिकार (RTI) अर्ज करण्याचीही ऑनलाइन सुविधा

क्लास चालू असतानाच कोसळला स्लॅब, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, कोपरखैरणेमधील घटना

नवी मुंबई कोपरखेरने सेकटर - 2 मद्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विध्यभावन या चार मजली इमारती मधील पहिला मजला वरील स्लॅब तळमजल्यावर पडून दुर्घटना घडली स्लॅब कोसळल्याने तलमजल्यावर खाजगी क्लासेस घेत असलेल्या महिला शिक्षक आणि आठ विद्यार्थी याखाली अडकले होते.

अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातून 3 बांगलादेशी तरुणींना शेवगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूर महानगर पालिका आयुक्तपदी बदली

- नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची बुधवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे

- त्यामुळे नागपूर महानगर पालिकेच्या रिक्त झालेल्या मनपा आयुक्तपदी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजयदुर्ग ते मुंबई रो-रो जलवाहतूक बोट मुंबईकडे रवाना

तब्बल ६ तासानंतर रो रो बोट निघाली मुंबईकडे

मालवाहतूक छोट्या बोटीची M2M बोटीला बसली होती धडक

धडकेत M2M बोटीला पडले होते

दुबईहून आत्तापर्यंत पुण्यातील 128 नागरिक सुखरूप परत

Sangli : युद्धाची झळ, हळदीच्या दरात घसरण

आखाती युद्धाची झळ आता हळदीला.. व्यापारी आणि शेतकऱ्यांना फटका. तर हळदीच्या दरातही घसरण.

Virar : विरारमध्ये धुळवडच्या दिवशी दोन गटात हाणामारी 

विरार पूर्वेकडील कातकरीपाडामध्ये धुळवडच्या दिवशी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

या मारहाणीत तरुण एक दुसऱ्याला ठोशाबुक्याने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे

मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही तर याबाबत पोलीस ठाण्यात देखील कोणतीही तक्रार अद्याप नोंद झालेली नाही.

खासगी शिकवणीचा स्लॅब कोसळला; 5 जणांची प्रकृती गंभीर

कोपरखैरणेत खासगी शिकवणीचा स्लॅब कोसळला

स्लॅब खाली 20 विद्यार्थी अडकले

20 पैकी 10 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश

उर्वरित 5 जणांची प्रकृती गंभीर तर 5 जणांचा शोध सुरु असल्याची प्राथमिक माहिती

अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल

Shiv jayanti : शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला रायगडावर शिवप्रेमींची गर्दी

शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी

० शिवज्योत नेण्यासाठी मोठ्या संख्येत शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल

० शिवसमाधी स्थळी विधीवत पुजन करून ज्योत प्रज्वलीत करून शिवप्रेमी गावोगावी रवाना

Mumbai : सुप्रिया सुळे घेणार उद्धव ठाकरेंची भेट

सुप्रिया सुळे मातोश्रीवर दाखल

सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंची भेट घेणार

राज्यसभेसाठी शरद पवारांना दिलेल्या समर्थनासाठी उद्धव ठाकरे यांचे आभार मानणार

पालघरमध्ये आश्रम शाळा वस्तीगृहाला लागली भीषण आग

पालघर - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कांदरवाडी सूर्यानगर आश्रम शाळा वस्तीगृहाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज . वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच कपडे , शैक्षणिक साहित्य , गाद्या जळून खाक . अग्निशमन दल घटनास्थळी दाखल . वस्तीगृहात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी राहत असल्याची माहिती . सुदैवाने वेळेत दुर्घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला . स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीच्या प्रयत्न सुरू .

प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालं यश

मुंबई महानगरपालिकेच्या पी/पूर्व आणि पी/पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे. आमदार अस्लम शेख यांचे पुत्र आणि काँग्रेसचे नगरसेवक हैदर अली शेख यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.

Sangli : सांगलीत तरुणाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

सांगलीत तरुणाचा निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस

मृतदेह बॅरेलमध्ये कोंबून फेकण्यात आला विहिरीत

कल्याणात उन्हाच्या तडाख्यात दुचाकीला अचानक आग, बर्निंग बाईकचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद

कल्याणमध्ये उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली असून या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

  • माणगाव इंदापूर शहराजवळ वाहतूक कोंडी

  • वाहनांच्या 2 किमी पर्यंत रांगा

  • होळी सणानिमित्त मुंबई वरून गावी आलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

  • माणगाव पासून ढालघर फाटा पर्यंत वाहनांच्या रां

धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, दत्तु रामचंद्र गवळी असे मृत तरुणाचे नाव असून हनुमंतपाडा गावातील छोटीराम गवळी यांच्या किराणा दुकानाजवळ ही घटना घडली, आरोपी किसन गुलाब साबळे हा 22 वर्षीय तरुण दुकानाजवळ थांबलेला असताना पुतणी सोबत का बोलत उभा आहे म्हणत सदत्तु गवळी यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले, यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात किसन साबळे याने दत्तु गवळी यांना शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर आपटल्याने तरुण बेशुद्ध पडला.

जखमी अवस्थेत तरुणास पिंपळनेर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला, या प्रकरणी किसन साबळे याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

व्ही एस आर कंपनीचे मालक व्हि के सिंग यांची सीआयडी कडून मागील सहा तासांपासून चौकशी सुरू

पार्थ पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी या संदर्भात चर्चा करणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली जानाई -शिरसाई योजनेची पाहणी...

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पाणी संदर्भात जानाई शिरसाई योजनेची पाहणी केलीय.. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून युगेंद्र पवार यांचा पाहणी दौरा महत्त्वपूर्ण आहे.. यावेळी जिरायती भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून समस्या देखील जाणून घेतल्या आहेत.. यंदा जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई होऊ देणार नाही असं आश्वासन युगेंद्र पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलंय...

रिसोड शहरालगत असलेल्या पावर हाऊस परिसरातील खुल्या जागेत लागली आग

वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या पावर हाऊस परिसरातील खुल्या जागेत आग लागण्याची घटना समोर आली आहे.. दुपारच्या सुमारास वारा असल्यामुळे आगीचे मोठे लोळ असल्याचं बघायला मिळालं. यात पावर हाऊस परिसरात झाडे झुडपे जळून खाक झाली होती.. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग आटोक्यात आटोक्यात आणण्यात यश मिळवल आहे...

बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव परीक्षा केंद्रावरती थेट हिंदीच्या पेपरला झेरॉक्स कॉपी पुरविण्यात आली होती. याची बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कार्यवाही करण्याचे आदेश थेट झेरॉक्स माध्यमातून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला होता तोच व्हिडिओ साम टीव्ही ने दाखवला त्यानंतर थेट आता संबंधित जातेगाव केंद्रावरील केंद्र संचालक शिक्षकांवर कार्यवाही होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; महापौर पदासाठी अर्धनग्न आंदोलन!

​सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून गेल्या ३२ वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 'अर्धनग्न आंदोलन' करण्यात आले. आंदोलनाचे समन्वयक राम जाधव यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली.

​गेल्या २८ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी रक्ताने पत्र लिहिणे, मुंडन करणे आणि मूक आंदोलने करण्यात आली असून विद्यमान महापौरांचा राजीनामा घ्या किंवा अडीच वर्षांपैकी उरलेले सव्वा वर्ष मराठा समाजाला महापौरपद द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

जर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक आमदारांनी मराठा समाजाला न्याय दिला, तरच त्यांचा जाहीर सत्कार करू, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही देण्यात आला.

बीडमध्ये दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 17 गाड्यासह 25 लाखांचे साहित्यजप्त, 3 आरोपी अटकेत

बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकली. या ठिकाणी चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून त्या मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी कारवाई करत दोन आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि साहित्य असा २५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावात यांनी दिली आहे..

नवी मुंबई महानगर पालिकेचा अजब कारभार

नवी मुंबई महानगरपालिकेत परिवहन सभापतींसाठी स्वतंत्र कॅबिनची व्यवस्था नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. परिवहन समितीच्या सभापतींना बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने सभापती नेमके कुठे बसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका प्रशासनावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर महापौरांचा पहिला जनता दरबार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून दर महिन्याच्या पाच तारखेला जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची आज औपचारिक सुरुवात झाली. महापालिकेच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या पहिल्या जनता दरबाराला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी गेल्या पाच ते दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या मांडल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, अतिक्रमण तसेच स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्नांकडे नागरिकांनी महापौर आणि महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीची महापौर रूपाराणी निकम यांनी स्वतः दखल घेतली. तसेच मांडण्यात आलेल्या समस्यांवर येत्या पंधरा दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत निर्णय घेण्यात येईल आणि बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील सातव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातून सतीश चौधरी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. बोगस आधारकार्ड बनवल्या प्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केलीय. सतीश हा इलेक्ट्रिशियन असून तो चोपडा तालुक्यातील च-हाडीतल्या गौतमनगर इथला रहिवासी आहे. त्याला आज अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी सहा जणांना अटक करण्यात आली होती.. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरेवाल, सुमित सोनकांबळे यांच्या अटकेनंतर कालच बदलापूर पोलिसांनी नाशिक मधून डॉक्टर अमोल पाटीलला अटक केली होती. त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर पोलिसांनी बोगस आधार कार्ड बनवणारा आरोपी सतीश चौधरी याला अटक करण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर

आमदारकी कार्यकर्त्यांच्या कष्टाने पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऐवजी आपल्याच लाडक्या लेकाला युवक शहराध्यक्ष व त्यानंतर आता स्विकृत नगरसेवक पदासाठी पण घराणेशाहीचाच बालहट्ट व त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी का?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जुने कार्यकर्ते असताना पण आमदार साहेबांनी लाडके लेकाला युवक शहर अध्यक्ष केले व त्यानंतर युवक शहर अध्यक्ष सारखी सुवर्णसंधी भेटली तरी त्या संधीचं काय सोनं केलं हे पण त्यांनी सिद्ध केले नाही व आता अजून पक्षाचे वाटेला येणारे स्वीकृत नगरसेवक पद पण त्यांच्याच घरी का?

बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश

बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचा गुन्हे शाखा युनिट सातने पर्दाफाश केला.

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथून एक डॉक्टर व एजंट गिरी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात.

वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

डॉ आकाश सुभाष मलगुंडे (वय ३५ वर्षे, रा. धनगरवाडा, ढोकसंगवी, ता. शिरूर ) व एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे ( वय ५२ वर्षे, रा. ग्रामपंचायत जवळ, केसनंद गाव ) यांना ताब्यात घेण्यात आला आहे.

आजपासून राज्यभरात भव्य ‘जनआंदोलन’

महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि वाढत्या आर्थिक दबावाच्या निषेधार्थ आजपासून राज्यभरात भव्य ‘जनआंदोलन’ सुरू केले आहे.

मुंबईत आझाद मैदान येथे ट्रक, टेम्पो, खासगी बसेस आणि टॅक्सींसह सुमारे १ लाखांहून अधिक वाहने एकत्र येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी संघटनांच्या नेत्यां आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यामुळे ई-चलनमध्ये ५० टक्के आगाऊ दंड भरण्याच्या निर्णयासह इतर सुधारणा मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आज मध्यरात्रीपासून राज्यभर अनिश्चितकालीन संप सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये तसेच विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांबाहेर (RTO) निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतूक संघटनांनी दंडाची रक्कम “मनमानी आणि अतार्किक” असल्याचा आरोप के

भाजपकडून राज्यसभेसाठी मंत्री रामदास आठवले यांचा नाव जाहीर झाल्यानंतर आज रामदास आठवले यांनी आपला राज्यसभेचा अर्ज विधान भवनामध्ये भरल्या नंतर रामदास आठवले हे चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी थोड्या वेळात होतील दाखल

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा

सातशेचे बिल सत्तर हजार ,सौर ऊर्जेचा महावितरणने केलाय घात ,पीएम सूर्यघर योजना आता अंधारात,चालणार नाही ,चालणार नाही महावितरणची हुकुमशाही चालणार नाही अशा घोषणा देत पुण्यातील ग्राहक व सौर ऊर्जा च्या सामाजिक संस्थांनी वाढीव वीजबिल व पीएम सूर्यघर योजनेला महावितरणने लावलेल्या जाचक अटीच्या निषेधार्थ आज महावितरनच्या मुख्य कार्यालावर भव्य मोर्चा काढण्यात आला .

या मोर्चाची सुरुवात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आली तेथून पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पुणे कॅम्प व परिसरातून मोर्चा रास्ता पेठ येथील महावितरणच्या मुख्यालयावर धडकला.

दिल्लीसह, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात खुनाचे गुन्हे

विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या "सनी गँगच्या" सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या बेड्या

६२ लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी आरोपींकडून केला जप्त

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींकडून घरफोड्या

तर आरोपींवर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल

Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला

मुंबई -

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला

सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ, यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

Pune: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

मावळ -

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू मध्ये दाखल.

बीज सोहळ्यानिमित्ताने मुख्य मंदिरात पहाटेपासून काकड आरती अभिषेक महापूजा हरिनाम कीर्तन आयोजन.

संत तुकाराम महाराज यांची पालखी वैकुंठ गमन स्थळाकडे मार्गस्थ.

तुकाराम महाराजांचे विश्वस्त आणि अध्यक्ष यांनी केली महापूजा.

बारा वाजता वैकुंठ गमन स्थळ म्हणजेच नांदूरकीच्या झाडावर लाखो भाविक करणार फुलांची उधळण..

Buldhana: इंधन तुटवड्याच्या अफवेने पेट्रोल पंपाबाहेर वाहनचालकांची मोठी गर्दी

बुलडाणा -

इंधन तुटवड्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट

पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पॅनिक होऊ नये

जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आवाहन

Solapur: बोगस प्रमाणपत्रांच्या सहाय्याने बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अधिकाऱ्यांनीच लाटले 3 कोटी रुपये

सोलापूर -

- बोगस प्रमाणपत्रांच्या साह्याने बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अधिकाऱ्यांनीच लाटले 3 कोटी 63 लाख रुपये

- संबंधित 3 अधिकाऱ्यांसह एकूण 20 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल

- सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची मुले परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखवत शिष्यवृत्तीचे 3 कोटी 63 लाख लाटले.

- या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोषसिंग राजपूत आणि उज्वल सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल

Pune: व्हीएसआर कंपनीचे वी. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी सुरू

पुणे ब्रेकिंग

व्हीएसआर कंपनीचे वी. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी सुरू

सी आय डी कार्यालयात चौकशी सुरू

सिंग यांच्यासोबत वी एस आर कंपनीचे काही अधिकारी, कर्मचारी यांची सुद्धा चौकशी सुरू

विमान अपघाताच्या संदर्भात सी आय डी कडून वी एस आर कंपनीला प्रश्नावली देण्यात आली होती

Pune: सीआयडीकडून व्हीएसआर वेंचर्स कंपनीची चौकशी होणार

पुणे -

सीआयडीकडून व्हीएसआर वेंचर्स कंपनीची चौकशी होणार

सी आय डी ची वी एस आर कंपनीला प्रश्नावली

वी एस आर चे रोहित सिंग यांना सुद्धा सी आय डी बोलावण्याची शक्यता

अजित पवार यांच्या अपघाताबाबत म्हणणे मांडण्यासाठी सी आय डी कडून पत्र

Jalgoan: सोनं- चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, सोनं 700 तर चांदी 3 हजार रुपयांची स्वस्त

जळगाव -

सोनं- चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण

जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर 1 लाख 61 हजार 300 रुपयांवर जीएसटीसह 1 लाख 66 हजार 139 रुपयांवर

चांदीचे दर 2 लाख 72 हजार रुपयांवर तर जीएसटीसह 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर

Jalgaon: जळगावातील पहूरजवळील वाकोद शिवारात ५५ किलो गांजा जप्त

जळगाव -

जळगावातील पहूरजवळील वाकोद शिवारात पोलिसांच्या कारवाईत अडीच लाखांचा तब्बल ५५ किलो गांजा जप्त..

महामार्गावर पहूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून संयुक्त कारवाई करत आंतरराज्य गांजा माफियांच्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत केली मोठी कारवाई..

याप्रकरणी तिघांना अटक, अटकेतील तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

प्रकरणातून धुळे-मुंबईपर्यंत पसरलेल्या अमली पदार्थ साखळीचा मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राहक संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलामुळे ग्राहकांवर परिणाम होत असल्याच्या कारणामुळे नागरिक, व्यापारी, उद्योग आणि ग्राहक संघटनेच्या वतीने क्रांती चौक येथून महावितरण कार्यालयावर मोर्चा सुरू

Yavatmal: यवतमाळमध्ये भुरकी शेत शिवारात चण्याच्या गंजीला आग,आगीत शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

अँकर - यवतमाळच्या वणी येथील भुरकी शिवारात सोंगून ठेवलेल्या चण्याच्या दोन ढिगाऱ्यांना अज्ञाताने आग लावली. या आगीत संपूर्ण चणा जळून खाक झाला. यात संबंधित शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले, या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नांदेपेरा येथील शेतकरी नानाजी डोंगे यांनी चार एकर क्षेत्रावर चण्याची लागवड केली होती. चण्याची काढणी करून शेतातच त्याच्या दोन गंजी उभ्या करून त्या ताडपत्रीने झाकल्या. 32 क्विंटल चण्याच्या या दोन्ही गंजीला आग लावल्याने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये पांढरकवडा घनकचरा केंद्राला आग

यवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषदेच्या घनकचरा केंद्राला पुन्हा भीषण आग लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कचरा डेपोला आगीचे सत्र सुरू आहे. घनकचरा केंद्राच्या ज्या मागच्या बाजूला कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचलेले आहेत, नेमकी त्याच ठिकाणी वारंवार आग लागते. त्यामुळे या आगीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आग लागल्यानंतरही ती विझविण्यासाठी कुठलीही तत्परता नगरपरिषद प्रशासनाने दाखविली नसल्यानेही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी कचरा साठवून तो शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत गाडण्याऐवजी, तो जाळून नष्ट करणे हा सोयीस्कर मार्ग तर नाही ना? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पांढरकवडावासीय करत आहेत.

Vasai-Virar: वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

वसई विरार महापालिकेचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

सुर्या टप्पा 01 जुनी सुर्या योजना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नाल्यामध्ये ना दुरुस्त झाली असल्याने, भरती , ओहोटी वेळी काम करावे लागत असल्याने कामास अडथळा निर्माण होत आहे.

जुन्या योजने अंतर्गत होणारा 100 द ल ली पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, उध्या 6 मार्च पर्यंत नादुरुस्त पाईपलाईन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे

त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे अहवान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी केले आहे.

Nashik: नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

6 स्वीकृत नगरसेवक पदासाठी 500 जणांनी अर्ज केल्याने भाजपची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता

स्वीकृत नगरसेवक पद मिळण्यासाठी इच्छुकांची जोरदार बिल्डिंग

मात्र 500 जणांपैकी भाजप नेतृत्व कुणाला संधी देणार, याकडे लक्ष

Vengurla: वेंगुर्ल्यातील आंबा बागांची राजू शेट्टींकडून पाहणी

आंबा काजू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा थेट परीणाम आंबा काजूवर झाला आहे. कोकणातील या आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. देवगड नंतर त्यांनी वेंगुर्ल्यातील आंबा बागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान भरपाईसाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली असून सरकार जर सरसकट नुकसान भरपाई देणार नसेल तर परीणाम भोगावे लागतील असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे

तळकोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला

तळकोकणात सध्या शिमगोत्सवाची धुम पाहायला मिळतेय. धुळवडी नंतर शिमग्याचा उत्साह तर शिगेला पोचला आहे. सिंधुदुर्गात गावागावातील काही हौशी मंडळे घरोघरी जाऊन पौराणिक वेशभूषेत खेळ करतात तर काही ठीकाणी राधा कृष्ण नाचवले जातात. कृष्ण, राधा, ब्राह्मराक्षस, हनुमान, अशी आकर्षक वेशभूषा करून नाचे पौराणिक गाण्यावंर नाचत निखळ मनोरंजन करतात. प्रत्येक घराच्या अंगणात हे नाचे पौराणिक वेशभुषेत नाच करतात. हे खेळ पाहण्यासाठी लोकही गर्दी करतात. पाहूयात सिंधुदुर्गात कशा प्रकारे खेळला जातो नाच्यांचा खेळ.

Dehu: देहूत बीज सोहळ्यानिमित्ताने वैष्णवांची मांदियाळी..

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात आज देहू नगरीत संपन्न होणार आहे. बारा वाजता नांदूरकीच्या झाडावर भाविक आपल्या हातातील पुष्प अर्पण करून हा सोहळा साजरा करणार आहे. या बीज सूर्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल झालेले आहे. मंदिर देवस्थान आणि नगरपंचायतीच्या वतीने जयत तयारी करण्यात आलेली आहे.

Nashik: तपोवन वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचा नाशिक महापालिकेला दणका

नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी सुनावणीदरम्यान नाशिक महानगरपालिका यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत चांगलेच झापले आहे. या प्रकरणात महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बुधवारीही मनपा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. दरम्यान, मनपाने हरित लवादात सुरू असलेले प्रकरण प्रथम उच्च न्यायालयात चालवावे, असा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत प्रकरण हस्तांतरित करण्यास नकार दिला आहे. तपोवन परिसरातील कथित बेकायदेशीर वृक्षतोड थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरातील वृक्षतोडीवर स्थगिती देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होणार असून, त्या दिवशी प्रतिज्ञापत्र सादर न झाल्यास मनपावर कठोर आदेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shivneri: शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

एसटीची शिवनेरी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

ऐन उन्हाळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यात प्रवाशांना करता येणार ए सी मधून प्रवास

नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त २०० व्होल्व्हो बसेसची खरेदी प्रक्रिया

मुंबई पुणे अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवाशासाठी शिवनेरी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळालेल्यानंतर आता मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी धावणार

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भापर्यंत शिवनेरीचा आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास सुरू होणार आहे

Pune: पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत

पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत

नागरिकांनी घाबरून न जाण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशन चे आवाहन

पुणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नेहमीच सुरू असून सध्या कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही अशी माहिती पेट्रोल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे

समाज माध्यमांवर पेट्रोल साठा संपत असल्याचे अफवा पसरल्या जात आहेत नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये किंवा ज्यादा इंधन खरेदी करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे

Pune: पुण्यात दोन तास रिक्षा राहणार बंद

पुण्यात दोन तास रिक्षा संघटना आणि प्रवासी मालवाहतूक संघटना च्या आंदोलनामुळे वाहतूक बंद असणार

ई चलनाविरुद्ध पुण्यात आज रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीचे निदर्शने

आंदोलनादरम्यान दोन तास रिक्षा आणि महार प्रवासी मालवाहतूक बंद असणार

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने होणार पोलिसांच्या ई-चलना विरुद्ध निदर्शने

घटनाबाह्य व बेकायदेशीर जबरदस्तीची वसुली बंद करण्याचा मागणीसाठी निदर्शने

११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे आंदोलन

Pune: दुबई, अबू धाबी मधून 111 प्रवासी पुण्यात परतल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

दुबई, अबू धाबी मधून 111 प्रवासी पुण्यात परतल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

198 नागरिकांपैकी 111 नागरिकांना पुण्यात सुखरूप आणण्यात आले आहे

19 नागरिकांच्या विमान उड्डानाची वेळ बदलल्याने 54 नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे

दुबईत गेलेल्या प्रवाशांचे नातेवाईक संपर्क करत असून प्रवाशांची संख्या वाढत असल्याची माहिती

Nanded:नांदेडमध्ये अनैतिक संबंधातून 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात अनैतिक संबंधातून एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील 22 वर्षीय दुर्गेश्वर ठाकूर याचे थडीसावळी येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत दुर्गेश्वर ठाकूर याचे चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतीक सबंध होते.त्यांच्या संबंधाची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना मिळाली.महीलेच्या नातेवाईकानी दुर्गेश्वर ठाकुर याला गावात बोलावून घेतले. आले.आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस ? असा जाब विचारत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या गुप्तांगावर लाथा मारण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली.त्यानंतर त्याला उलट्या होऊन जागीच मृत्यू झाला.अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी गावातील तीन आणि तेलंगणातील चार अश्या सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.

नागपुरात १२ वी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक वळण

विद्यासाधना शिक्षण संस्थेचा संचालकच मुख्य सूत्रधार असल्याचा तपासात निष्कर्ष

संदीप बाबुराव सरटकर (वय ५४) अस आरोपीचे नाव आहे..

खासगी शिकवणी संचालकाला पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती..

पोलिसांकडून गेल्या शुक्रवारी अटक, मोबाईलमधील डाटा डिलीट केला होता, मात्र सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन तपास सुरू

आणखी किती जणांना पेपर पुरवले? आर्थिक व्यवहारांची चौकशी

१८ फेब्रुवारीला सेंट उर्सुला शाळेतील परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना प्रकार उघड

विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू

रायगड जिल्ह्यातील 20 नागरीक आखाती देशात अडकल्याची प्राथमिक माहिती

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील 20 जण आखाती देशात अडकून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील 17 जण नोकरीनिमित्त सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र सध्या मध्यपूर्वेतील युद्ध जन्य परिस्थितीमुळे ते मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाचा त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उरण तालुक्यातील कविश घरत आणि प्रांजली घरत हे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले असून ते हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तर पाली येथील उत्कर्ष मापारा शिक्षणासाठी दुबईत गेला आहे. तो देखील सुरक्षित असून कुटुंबियांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कर्जत तालुक्यात बिबट्याचा हल्ला; तुंगी गावात तीन गोवंशीय जनावरे ठार

कर्जत तालुक्यातील तुंगी गाव येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तीन गोवंशीय जनावरांचा खात्मा केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी हनुमान शिवाजी सुपे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुपे यांच्या मालकीची दुभती जनावरे गोठ्यात बांधलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्र प्राण्याने हल्ला केला. गोठ्याच्या खिडकीतून उडी मारून आत प्रवेश करत जनावरे फस्त केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ४ मार्च रोजी मध्यरात्री घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यात वणवा

राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यात काल वणव्यामुळे आग लागली होती. राजमात वाड्यात लागलेल्या या वणव्यामुळे ऐतिहासिक वास्तुंबाबत पुरातत्व विभागाची बेफिकीरी समोर आली असून याबाबत स्थानिक नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंचा राजवाड्याचे भग्नावस्थेतील अवशेष आहेत. राजमातांचे सर्वाधिक काळ वास्तव्य या वाड्यात होते तर याच वाड्यात राजमातांची अखेरचा श्वास घेतला या मुळे हा ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. हा वाडा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिकांकडून केला जात आहे.

महाडमध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

महाड शहरातील प्रांत कार्यालयाजवळील विद्युत ट्रान्सफॉर्मरला काल सायंकाळी अचानक आग लागली. मोठा आवाज करीत ट्रान्सफॉमर पेटल्याने परिसरात घबराट पसरली. ट्रान्सफॉमर शेजारील उंबराच्या झाडाच्या फांद्या घातल्याने ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याची शक्यता होत आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल असल्याने आग वेगाने भडकली. महाड नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत फोमचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, दरम्यान काहीकाळ महाड शहरातील विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता तर परिसरातील गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.

जालना महानगरपालिकेत काँग्रेसकडून चक्क भाजपच्या पराभूत उमेदवाराला स्वीकृत सदस्य म्हणून संधी

जालना महानगरपालिकेत काँग्रेसकडून चक्क भाजपच्या पराभूत उमेदवाराला स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज मिळाला आहे. जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यावरून काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.जालना जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या गटनेते आमने-सामने आले आहेत. भाजपकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या विनोद रत्नपारखे यांनाकाँग्रेसने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्याने जालनाच्या राजकारणात खळबळ उडालीय.दरम्यान आमचा गटनेता विकला गेला अशी खंत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखवली तर जिल्हाध्यक्ष काँग्रेस संपवण्यासाठी निघाल्याचा पलटवार गटनेत्याने केला आहे..

रायगड जिल्ह्यातील 20 नागरीक आखाती देशात अडकल्याची प्राथमिक माहिती

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील 20 जण आखाती देशात अडकून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील 17 जण नोकरीनिमित्त सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र सध्या मध्यपूर्वेतील युद्ध जन्य परिस्थितीमुळे ते मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाचा त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उरण तालुक्यातील कविश घरत आणि प्रांजली घरत हे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले असून ते हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तर पाली येथील उत्कर्ष मापारा शिक्षणासाठी दुबईत गेला आहे. तो देखील सुरक्षित असून कुटुंबियांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

SCROLL FOR NEXT