लातूरच्या मुरुड परिसरात अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे,स्थानिक नागरिकांकडून सातत्याने अवैध दारू विक्री बाबत आवाज उठवला जात आहे, मात्र दारू विक्री बंद होत नसल्याने मुरुड पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी निदर्शने आंदोलन केले आहे. परिसरातील दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी महिलांमधून होते आहे. वारंवार तक्रार आणि निवेदन देऊन ही, दखल घेतली जात नसल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलाच पाहायला मिळाला .
पुण्याच्या वाघोली मध्ये लहान रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी.
वाघोली, येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. काल पार पडलेल्या होलिकादहनानंतर आज रंगपंचमीच्या निमित्ताने परिसरात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करत, गुलाल उधळत आणि एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, रंगांची धुळण उडवत सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, एकोप्याचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण. या पवित्र अग्नीमध्ये सर्व नकारात्मकता दहन होवो आणि येणारा काळ आनंद, समृद्धी आणि रंगांनी भरून जावो, अशीच सर्वांची भावन आहे.
धाराशिवमध्ये कालाकेंद्रात पुन्हा राडा
चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा ; सहा जणांची घुसखोरी
डोक्याला पिस्तूल तर गळ्याला सुरा लावून 9 लाख 51 हजाराचा मुद्देमाल केला लंपास
येरामाळा पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल 6 ते 7 जण केले आरोपी, तपास सुरू
फिर्यादी च्या तक्रारी वरून सचिन पवार सह पाच अज्ञात आरोपी व महादेव घुले वर संशय
घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण तिघेजण जखमी
घटनेने धाराशिव जिल्यात पुन्हा एकदा खळबळ
आज खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय.. खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होवून 6 वाजून 48 मिनिटांनी संपणार आहे.. या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असुन साई समाधीवर दुर्वा, तुळशीपत्र यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहेत.. ग्रहण कालावधी संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान पार पडेल आणि धुपारती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू होईल..
मराठा समाजाला दिलेलं आरक्षण चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही असा दिलासा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी दिले आहे. दरम्यान स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी आपण राज्यातील सर्व दौरे रद्द करणार आहोत असे जरांगे यांनी जाहीर केले.
करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील मराठा मेळाव्यात त्यांनी भावना व्यक्त केल्या
चार-पाच दिवसानंतर राज्यातील सर्व दौरे एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे माझी संपत्ती समाज आहे आयुष्यात मी एक रुपया कमावला नाही माझं कुटुंब डावावर लागलं कोणी कधी मला मारून टाकतील माझ्या कुटुंबाला त्रास देतील तरी मी मागे हटत नाही रात्र दिवस समाजासाठी बाहेर फिरतो आहे मला धमक्या येत आहेत हे करणार ते करणार कोणीतरी म्हणाला भंडारा लावून मारून टाकतो गरिबाचं काम करतोय म्हणून मला मारायचा ठरलंय का मी मरायला भीत नाही माझी कधी पण तयारी आहे माझा समाज पण सज्ज आहे असं प्रति आव्हान जरांगे यांनी धमक्या देणाऱ्यांना दिलेला आहे
आखाती देशांकडे निर्यातीसाठी तयार ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे यांसह फळ फळावळांचे सुमारे 1000 कंटेनर जेएनपीटी बंदरात पडून असून,कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम झाल्याची माहिती आहे तरयुद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक क्षेत्रात मोठी अनिश्चितता दिसून येत आहे.शिपिंग कंपन्यांनाचाही आखाती देशात माल पाठवण्यास नकार असल्याने काही जहाजांना माघारी फिरण्याचे दिले आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
जेएनपीएतून दर आठवड्याला जवळपास 54 मालवाहू जहाजांची ये जा होत असते.
युद्धाचा संपूर्ण परिणाम स्पष्ट होण्यासाठी आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता आहे,यावेळी याचा परिणाम आशियातील सर्वात मोठी असलेली बाजारपेठ नवी मुंबईतील वाशी मधील एपीएमसी बाजारावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत..
जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत . ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते . फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत .पहूर पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे .
होळी सणा निमित्त सोमवारी नांदेड शहरात महामूर्ख कवि संमेलन पार पडले. अनेक कविनी यात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उदघाट्न तृतीय पंथीयाच्या हस्ते गर्दभराजाला पुष्पहार टाकून करण्यात आले. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून मागील 26 वर्षा पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं . द्विअर्थी कवि संमेलनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो,मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय.. धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते, कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत... पाचशे रुपये पासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे.. मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने, त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतंय.. विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ केली आहे.
नागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साह....
गुलाबाच्या फुलांची होळी खेळत नागपुरकरांनी होळी सणाचा घेतला आनंद
रासायनिक रंग न वापरता पर्यावरण पुरक होळीसाठी फुलांची पाकळ्या करून पर्यावरण पूरक हॉलिबद्दल जनजागृती
फुलांच्या होळीत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग
रासायनिक रंग न वापरण्याचं आवाहन अमलात आणून फुलांच्या पाकळ्यांची उधळण...
फुलांची होळी खेळत सर्वत्र गुलाबाच्या पाकळ्यांची चादर, फुलांचा नैसर्गिक रंगात होळी खेळत पाण्याची बचतीचाहाही दिला संदेश...
कोकणात शिंमगोत्सवाची धूम
मोठ्या संख्येने कोकणवासीय शिंमगोत्सवासाठी कोकणात दाखल
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देवभैरी च्या शिमगोत्सवाला सुरुवात
ग्रामदेवतेच्या भेटीसाठी आसपासच्या गावातील पालख्या श्री देवभैरी मंदिरात
रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्रीदेवभैरीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले मनोभावे दर्शन
मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता जरांगे पाटील शेतकरी कर्जमाफीसाठी आणि हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तशी घोषणा जरांगे यांनी करमाळ्यात बोलताना केली आहे.
शेतकर्यांनी आंदोलनासाठी एकत्र आले पाहिजे. तुमचे कर्ज ठेवत नाही. शेतीमालाला आणि दूधाला हमीभाव कसा मिळत नाही ते मी पहातो. पीक विमा सुध्दा मिळवून देतो. तुम्ही फक्त चल म्हटलं की माझा सोबत आलं पाहिजे. शेतकर्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे असे आवाहन ही जरांगे यांनी केले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण प्रकरणात पोलीसांची सुमोटो कारवाई
मारहाण करणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल
पप्पू आचारी, तुकाराम बुरुंगे यांच्यासह अन्य 4 सुरक्षारक्षांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
एका भाविकाला सुरक्षारक्षकांच्या टोळक्याने कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी केली होती मारहाण
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानच्या मनमानी कारभाराची प्रांताधिकाऱ्यांमार्फतही सुरू करण्यात आलीय चौकशी
एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक ..
मालक आलोक चौधरी फरार ...
पोलीसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरु ..
या प्रकरणात आतापर्यंत 19 कामगारांचं मृत्यू झाला असून 22 कामगार गंभीर जखमी आहे. त्यात 12 जखमींची प्रकुर्ती गंभीर आहे.
सांगली महापालिकेची पहिल्याच महासभा प्रचंड वादळी ठरली. पहिल्याच पार पडलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.. शहरातल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना, आणि एलइडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून अधिकारयांना चांगलेचं धारेवर धरले. तर प्रशासकीय काळात महासभा घेऊन करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी देखील महासभेत करण्यात आली.. यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत पडताळणी करून बेकायदेशीर असणारे ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल असा आश्वासन या सभेमध्ये दिले.तसेच एलइडी बाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.
धुलीवंदना निमित्त आज बाजारपेठेत रंग घेण्याकरिता गर्दी फुललेली आहे बच्चे कंपनी तथा पुरुष व महिलांनी सुद्धा रंग घेण्याकरिता गर्दी केलेली आहे महागाई जरी वाढलेली असेल तरी धुलीवंदन या सणावर काही फरक पडलेला नाही रंग गुलाल घेणाऱ्याकरिता बाजारपेठेत गर्दी फुलून दिसली आहे.
अमरावतीच्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मेळघाट दौऱ्यादरम्यान आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली.यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य करत सणाचा आनंद लुटला.मेळघाटातील गावांमध्ये होळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आदिवासी महिलांनी पारंपरिक गोंड आणि कोरकू नृत्य सादर केले. त्यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आदिवासी बांधवासोबत आदिवासी नृत्यावर ठेका धरला.
रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीचे औचित्य साधून रमाई सेवाभावी संस्थेतर्फे 'रमाईची लेक' पुरस्कार सोहळा 2026 पार पडला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.रमाई सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रशासन, पोलीस दल, शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा राजकीय आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘रमाईची लेक’ या पुरस्काराने सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आलं.या पुरस्कार सोहळ्यामुळे समाजात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव झाला असून, अनेकांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला आहे.
जवळचे पैसे संपल्याने राहण्याची आणि खाण्याची अडचण होत असून आम्हाला भारत सरकारने भारतात येण्याची सोय करावी ज्येष्ठ नागरिकांची विनंती
धाराशिवच्या उमरगा येथील दोन जोडपे युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकले दुबईत
केंद्र सरकारने विशेष विमानांची सोय करुन आम्हाला भारतात आणवे, उमरग्यातील अडकलेले पर्यटक दळगडे व माशाळकर कुटुंबीयांची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबईला गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत
पर्यटनासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक 1 मार्चला परतणार होते भारतात मात्र दुबईतून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली
आज सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत पुणे मेट्रो राहणार बंद
दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू राहील
दुपारी तीन नंतर प्रवाशांना मेट्रो ने प्रवास करता येणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.