Manasvi Choudhary
पावसाळ्यात रानावनात उगवणारी औषधी वनस्पती म्हणजे चिचुर्ड्याची भाजी.
वटाण्यासारखी दिसणारी चिचुर्ड्याची भाजी चवदार लागते. आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानली जाते.
चिचुर्ड्याची भाजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे.
ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला चिचुर्ड्याची भाजी, कांदा, जिरा, मोहरी, तेल, टोमॅटो, लसूण, हळद, मसाला, मीठ , ओले खोबरे, गूळ, कोथिंबीर हे साहित्य घ्यावे लागेल.
भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी चिचुर्ड्याची भाजी स्वच्छ धुवून घ्या. त्याचे काटे काढा. त्यानंतर वरंवटाखाली भाजी दाबून घ्या म्हणजे त्यातील बिया बाहेर निघतील. त्यानंतर पुन्हा ही भाजी स्वच्छ धुवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे याची फोडणी द्या. बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, मसाला, मीठ हे मिश्रण घालून चांगले परतून घ्या.
भाजीवर झाकण ठेवून शिजवून घ्या. भाजी शिजल्यानंतर त्यात ओला खोबरा आणि गूळ किसून घाला म्हणजे भाजी तयार होईल.